*शब्दरंगच्या सप्तरंगी कलाविष्काराने उपस्थित मंत्रमुग्ध*
पिंपरी
“शब्दरंग’ हा कलेतील सर्व रंग एकत्रित करणारा साहित्य कट्टा आहे!’ असे गौरवोद्गार सामाजिक कार्यकर्त्या स्वाती देशपांडे यांनी मनोहर वाढोकर सभागृह, ज्ञानप्रबोधिनी, निगडी प्राधिकरण येथे रविवार, दिनांक १६ मार्च २०२५ रोजी काढले. शब्दरंग कला साहित्य कट्टा या संस्थेच्या चवथ्या वर्धापनदिन सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून स्वाती देशपांडे बोलत होत्या. शब्दरंगच्या अध्यक्षा ज्योती कानेटकर, प्रियंका आचार्य, चंद्रशेखर जोशी, सुभाष भंडारे, आनंद मुळूक, अशोक अडावदकर यांची व्यासपीठावर तसेच माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, भारती फरांदे, सामाजिक कार्यकर्त्या सरिता साने, बाळा शिंदे, नागेश चव्हाण, सतीश सगदेव, रमेश वाकनीस, सुरेश भंडारे आदी मान्यवरांची सभागृहात मोठ्या संख्येने उपस्थिती होती. नटराज पूजन आणि गणेशवंदनेने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. ज्योती कानेटकर यांनी प्रास्ताविकातून, ‘पिंपरी – चिंचवड या औद्योगिकनगरीत शब्दरंग कला साहित्य कट्टा चार वर्षांपासून सांस्कृतिक योगदान देत आहे, याचा मनापासून आनंद वाटतो!’ अशी भावना व्यक्त केली.
शब्दरंगच्या महिला लेझीम पथकाने लयबद्ध पदन्यासाद्वारे प्रेक्षकांमधून व्यासपीठावर आगमन करीत शिववंदना दिली. त्यानंतरच्या “गर्जा महाराष्ट्र माझा…” या महाराष्ट्रगीताच्या सादरीकरणाने कलाविष्काराची दमदार सलामी दिली. ‘अच्युतम् केशवम्’ हे समूहनृत्य भक्तिरसाचा परिपोष करणारे होते; तर वयाची पासष्टी ओलांडलेल्या महिलांचे वारीनृत्य तरुणींना लाजविणारे होते. “चला जेजुरीला जाऊ…” या बहारदार लावणीनृत्याने वन्स मोअर मिळविला; तर योगनृत्याच्या माध्यमातून निरामय आरोग्याचा संदेश दिला. यासोबतच मध्यमवर्गीयांचे बचतीचे प्रयोग, शेजारधर्म, कार्यालयातील प्रमोशनच्या कथा अन् व्यथा तसेच साडी खरेदी या मिस्कील नाटिकांनी श्रोत्यांना खळखळून हसवले. यमन रागातील गीतांचे तसेच ‘सूर एक गीत अनेक’ या संकल्पनेंतर्गत एकाच सुरावटीतील वैविध्यपूर्ण गीतांचे सुश्राव्य सादरीकरण संगीतप्रेमींना सुखावणारे होते. समारोप प्रसंगी आसाम प्रांतातील बिहू या लोकप्रिय पारंपरिक नृत्याने आणि विविध हिंदी चित्रपटगीतांमधील पाश्चात्त्य शैलीतील आकर्षक नृत्यशृंखलेने कार्यक्रमाचा कळसाध्याय गाठीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. शब्दरंग कला साहित्य कट्टा या संस्थेतील विविध वयोगटातील सदस्यांचा अन् विशेषत: महिलांचा पारंपरिक वेषातील लक्षणीय सहभाग रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवून गेला.
क्षिप्रा पटवर्धन, प्राजक्ता ठकार, जगदीश देशपांडे, प्राजक्ता निफाडकर यांचा संयोजनातील
सहकार्याबद्दल प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. अशोक अडावदकर आणि ज्योती कानेटकर यांनी कलाविष्काराचे खुसखुशीत निवेदन केले; तर माधुरी ओक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सुभाष भंडारे यांनी आभार मानले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
______________________________
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला*
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
