सावंतवाडी आयोजित रंगीला चषकाचा मल्हार स्पोटर्स संघ मानकरी…
आर.व्ही. स्पोटर्स संघ उपविजेता; मयुर लाखे मित्रमंडळाचे आयोजन…
सावंतवाडी
येथील सावंतवाडी जिमखाना मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या रंगीला चषकाचा मानकरी सामाजिक कार्यकर्ते परशुराम चलवादी यांचा मल्हार स्पोटर्स हा संघ ठरला तर सागर लाखे यांचा आर.व्ही. स्पोटर्स हा संघ उपविजेता ठरला. येथील सामाजिक कार्यकर्ते मयुर लाखे मित्रमंडळाच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा आज खेळविण्यात आली. यात चार संघ सहभागी झाले होते.