You are currently viewing कुडाळ मॉन्सून रन “बेस्ट रेटेड हाफ मॅरेथॉन” किताबाने सन्मानित….

कुडाळ मॉन्सून रन “बेस्ट रेटेड हाफ मॅरेथॉन” किताबाने सन्मानित….

कुडाळ मॉन्सून रन “बेस्ट रेटेड हाफ मॅरेथॉन” किताबाने सन्मानित….

कुडाळ

राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेन्टर यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कुडाळ मॉन्सून रनला “बेस्ट रेटेड हाफ मॅरेथॉन ऑफ द इयर २०२४ ” या किताबाने सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई रोड रनर या संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व मॅरेथॉन मधून कुडाळ मॉन्सून रनची हाफ मॅरेथॉन गटात निवड करण्यात आली. अलिकडेच मुंबईत झालेल्या सोहळ्यात राणे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर कुडाळचे ए.टी. राणे आणि डॉ. जी.टी. राणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह हा सन्मान स्वीकारला.

या सोहळ्यात कुडाळ मान्सून रनला “बेस्ट रेटेड हाफ मॅरेथॉन ऑफ द ईयर २०२४” च्या सन्मानाने सन्मानित करण्यात आले तर “टाटा मॅरेथॉनला बेस्ट रेटेड फूल मॅरेथॉन ऑफ द ईयर २०२४” ने सन्मानित करण्यात आले. मुंबई रोड रनर या संस्थेमार्फत महाराष्ट्र व इतर जवळच्या झालेल्या सर्वे मध्ये कुडाळ मान्सून रन ही पहिली ठरली.

मुंबई रोड रनर सर्व मोठ्या मॅरेथॉनला रेटिंग देते. कुडाळ मान्सून रन ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रथमच आयोजित मान्सून मॅरेथॉन होती. यासाठी सुद्धा त्यांचेही कौतुक मुंबई रोड रनरच्या सोहळ्यात करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा