*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
@ *धुळवड असते वर्षभर* @
छत्तीस जिल्हे महाराष्ट्राचे
चुरस लागलीय *गुन्ह्यांची*
चोरी खंडणी क्षुल्लक आहे
भर पडतेय त्यात मुडद्यांची
घालून वेड्या रोजच धिंड
हल्ली निघते शहरो शहरी
लाज कुणास वाटत नाही
लागते कुठे त्यांचे जिव्हारी
पैसा मानून परमेश्वर आपला
रोज *हुडकती* बकरा नवा
पैशासाठी *गरीब* हपापतो
गमावून बसतो आपले जिवा
फुका संपवतो आयुष्य आपले
विश्वास ठेवून आक्काबक्कावर
कळतही नाही त्यास *कधीच*
तडफडत मरतो हम रस्त्यावर
दिडशे कोटीची मुक्त *द्वीपदे*
आनंद घेतायत *स्वातंत्र्याचा*
नाही *माहीत* “त्यांनासुद्धा”
कधीही लागेल नंबर *त्यांचा*
विनायक जोशी 🖋️ठाणे
मीलनध्वनी/9324324157
