भोसले इंटरनॅशनल स्कूलची ‘सुवर्ण ‘कामगिरी….
सायन्स ऑलिंपियाड मध्ये १७ गोल्ड….
सावंतवाडी
यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल सायन्स ऑलिंपियाड परीक्षेत उत्तम यश प्राप्त केले. शाळेच्या एकूण ७५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आणि सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे १७ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक प्राप्त करत शाळेचा नावलौकिक वाढवला आहे.
सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांची नावे: इयत्ता दुसरी – मानस विजय परब, तिसरी – आदित्य परेश धारगळकर, अर्णव राहूल शेवाळे, प्रिश रवी गोलघाटे, मैत्रेयी प्रवीण देवर्षी, सहावी – आरव नितीनभाई गरधारिया, सानिका आत्माराम नाईक, निधीश संतोष राऊळ, सातवी – ध्वनील किरण सामंत, प्रथमेश मनीष कानविंदे, आरुष अमोल चव्हाण, मयुरेश तानाजी घाटकर, आठवी – माही ललीतकुमार विठलानी, नववी – कुशल संभाजी सावंत, नरेश प्रशांत वस्त, भालचंद्र अविनाश प्रभुवालावलकर, दहावी – लारा फ्रान्सिस डिसोजा.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंतभोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक आणि मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांनी अभिनंदन केले.