You are currently viewing पणदूर येथे आम. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

पणदूर येथे आम. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

कुडाळ :

कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस १७ मार्च रोजी जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त आज कुडाळ तालुक्यातील पणदूर येथे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दादा साईल मित्र मंडळ आयोजित शिवसेना शाखा पणदूर पुरस्कृत क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी जि प अध्यक्ष संजय पडते, माजी जि प अध्यक्षा सौ. दीपलक्ष्मी पडते, जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी, दादा साईल, तालुकाप्रमुख अरविंद करलकर, महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, तालुका प्रमुख बंटी तुळसकर, सिद्धी शिरसाठ, चंद्रकांत साईल, रामचंद्र नरे, सरपंच पल्लवी पणदूरकर, माजी पंचायत समिती सभापती राजन जाधव, सावळाराम अणावकर, माजी सरपंच बापू सावंत, विनायक आणावकर, कुबल गुरुजी, माजी सरपंच शिवराम पणदूरकर, बाव गावचे माजी सरपंच नागेश परब, बाळू गवाणकर, राकेश कांदे, देवेंद्र सामंत, गणेश साईल, माजी पोस्ट मास्तर उत्तम पणदुरकर, माजी सरपंच बबन पणदुरकर, हरेश साईल, निखिल कांदळगावकर, प्रशांत परब, तात्या सावंत, पवन पणदुरकर आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार चषक २०२५ क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरू झाली असून पुढील तीन दिवस ही स्पर्धा रंगणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा