मालवणात १७ मार्चला स्मृतीलीला पुरस्कारांचे वितरण…
मालवण
सकल भंडारी हितवर्धक संस्था मालवण व मालवण स्पोर्ट्स असोसिएशन आणि हडकर कुटुंबीयांच्या वतीने सौ. नंदिनी राजेश पाटील पुरस्कृत सर्वोत्कृष्ट गुणवंत अष्टपैलू व्यक्तिमत्वास स्मृतिलिला पुरस्कार २०२५ देऊन गोरविण्यात येणार आहे. या पुरस्कारांचे वितरण १७ मार्चला सायंकाळी ४ वाजता भरड येथील लिलांजली हॉल येथे होणार आहे.
यावर्षी क्रिकेटपटू पुरस्कार – देवेंद्र रामचंद्र मांजरेकर, व्हॉलीबॉल पुरस्कार – शंकर (भाऊ) विनायक नामनाईक, मैत्री पुरस्कार – उल्हास आत्माराम सरमळकर यांना जाहीर झाला आहे. या कार्यक्रमास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकल भंडारी हितवर्धक संस्थेचे अध्यक्ष रवी तळाशीलकर, मालवण स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष रामा शेटये यांनी केले आहे.