*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कॅमेर्यासोबतच.. माझं जगणं..!*
स्वप्नांचे नटरंग क्षणाक्षणाला
माझ्या गर्भात सरकवतो
डोळ्यांतून ह्दयांत रेंगाळणार
व्यक्तीमत्व उभं करतो..
संशयाने चाचपडू लागताच
माझ्यांत स्वतःला झाकतो
फुलानं माळ्याचं..बोट धरावं
फोटोशाॅप माझ्यावर लादतो..
चिंतेची बाळबोध चाहूल
लेन्समधून प्रतिबिंबात पाहतो
सवाल गुंतण्याचा नव्हताचं
माझ्याशिवाय कसा जगतो..
झाली मांडामांड सारी
आतातुझ्या मनाला सावर
छातीकाढून उभा राहा
माझं…. जग तुझं वावर..
अस्तित्वाचं तुचं स्वरूप
वास्तवात झोकून दे
देहधर्मी माॅडेल तू
कवेत मला… घे..
बाबा ठाकूर.

