भोसले इंटरनॅशनल स्कूलचे ‘रिडींग चॅलेंज’ मध्ये सुयश….
विभागीय स्तरावर मिळवले विजेतेपद….
पुणे:
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सी.बी.एस.ई.) आयोजित ‘रिडींग चॅलेंज कॉम्पिटिशन’ मध्ये यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश संपादन केले. इयत्ता दहावीतील राहिनी रोशन राऊत आणि इयत्ता नववीतील विश्वजीत वैभव गायकवाड यांनी पुणे विभागात अव्वल स्थान पटकावले.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, त्यांच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक विकासासाठी आवश्यक कौशल्ये वाढवणे या उद्देशाने राज्यातील सीबीएसई शाळांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली. पुणे येथे झालेल्या विभागीय फेरीत भोसले स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विजेतेपद पटकावले.
दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंतभोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक आणि मुख्याध्यापिका प्रियंका देसाई यांनी अभिनंदन केले.