बापूसाहेब महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण राजघराण्याच्या पुढाकारातून…
खेम सावंताचे पालिकेला पत्र; सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सहकार्य करणार.
सावंतवाडी
येथील संस्थांनचे तत्कालीन महाराज बापूसाहेब भोसले यांच्या पुतळ्याची डागडुजी राजघराण्याच्या पुढाकारातून करण्यात येणार आहे. त्यासाठी येणारा ३५ हजार इतका खर्च करण्याची तयारी सावंतवाडी संस्थानचे राजे खेम सावंत भोसले यांनी दर्शविला आहे.
या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुक्याच्या मुख्याधिकाऱ्यांना त्यांनी लेखी पत्र देऊन याबाबत तयारी दर्शवली आहे. त्या पुतळ्याच्या डागडुजीसाठी आवश्यक असलेला खर्च आपण व सामाजिक बांधिलकीच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करणार आहोत. लवकरच त्या परिसराची सुशोभीकरण करण्यात येईल आणि तो खर्च आपण करू, अशी तयारी त्या पत्राच्या माध्यमातून त्यांनी दर्शविली आहे.