आमदार निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
कुडाळ :
आमदार निलेश आणि यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दिनांक 17 मार्च रोजी शिवसेना महिला तालुकाप्रमुख सिद्धी शिरसाठ आयोजित भव्य आंतरराज्यस्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. कुडाळ येथील पोस्ट कार्यालय समोर सिंधूदुर्ग राजा पटांगणावर रात्री नऊ वाजता ही स्पर्धा सुरू होणार आहे.
या स्पर्धेसाठी पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे रोख रुपये 21 हजार, 11 हजार आणि 7 हजार आणि आकर्षक चषक तशीच उत्तेजनार्थ दोन क्रमांकासाठी प्रत्येकी 2 हजार पाचशे आणि चषक दिले जाणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचे उपस्थितीत होणार आहे. रात्री 8 वाजता संकष्टी चतुर्थी निमित्ताने अभंग भजन मंडळाचे भजन सादर होणार आहे.
ग्रुप डान्स स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी नागेश नेमळेकर (9404164391 / 9823177201) किंवा दीपलक्ष्मी पडते (9730878579) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.