ऍट्रॉसिटी च्या आरोपातून निर्दोष मुक्तता
दोडामार्ग
झोळंबे येथील सौ. पूजा दीपक गवस यांची अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अर्थात ‘ऍट्रॉसिटी ‘ च्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली आहे. सिंधुदुर्ग चे विशेष न्यायाधीश श्रीमती सानिका एस. जोशी यांनी ही मुक्तता केली आहे.
झोळंबे येथील गावठाणवाडी मधील पूजा दीपक गवस यांनी आपल्याला जातीवाचक शिवी गाळ केल्याची तक्रार फोंडू न्हानु जाधव यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात दिली होती. त्या अनुषंगाने पूजा गवस यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधान कलम 504, 506 अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम – 1989 चे कलम 3(1)(r)प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. सर्वं साक्षी.. पुरावे तपासून घेतल्याच्या पार्श्वभूमी वर न्यायालयाने गवस यांची निर्दोष मुक्तता केली.