एल.ई.डी. लाईट वापरणाऱ्या नौकेवर कारवाई…
रत्नागिरी
समुद्रातील अनधिकृत मासेमारीला आळा घालण्याचे निर्देश मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्यानंतर रत्नागिरीचे मत्स्य व्यवसाय खाते ऐक्शन मोड वर आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून दापोली तालुक्यातील लाडघर- र-बुरोंडी समुद्रामध्ये सोमवारी मध्यरात्री एल.ई.डी. लाईट वापरणाऱ्या नौकेवर कारवाई करण्यात आली आहे. या नौकेवर तांडेलसह 4 खलाशी होते. सदर नौका जप्त करून दाभोळ बंदरात ठेवण्यात आली आहे
दि. 12/3/2025 रोजी रात्री 1.30 च्या सुमारास लाडघर बुरोंडी समोर मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी श्रीम. दीप्ती साळवी, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, दाभोळ) व श्री. स्वप्निल चव्हाण, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, गुहागर) हे स्थानिक लोकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने गस्त घालत होते. यावेळी राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवाना असलेली श्री. यासिन अब्दुल गफूर मुकादम, रा. खडप मोहल्ला, रत्नागिरी यांची नौका अब्दुल गफूर -नों. क्र. IND-MH-4-MM-6007 द्वारे महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात लाडघर- बुरोंडी समोर अनधिकृतरित्या एल.ई.डी. लाईट वापरत असल्याचे निदर्शनास आले. ही बोट विभागाने पकडली. या नौकेवर नौका तांडेलसह 4 खलाशी होते.