You are currently viewing “शिवायन” ऐतिहासिक महानाट्याच्या भव्य रंगमंचाचे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन

“शिवायन” ऐतिहासिक महानाट्याच्या भव्य रंगमंचाचे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन

मालवण :

कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त “शिवायन” या ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन १६ मार्च रोजी मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर सायंकाळी करण्यात आले आहे. या महानाट्याच्या भव्य रंगमंचाच्या उभारणी कामाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.

यावेळी शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगावकर, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख बबन शिंदे, माजी नगरसेवक दीपक पाटकर, माजी उपनगराध्यक्ष राजू वराडकर, शहरप्रमुख बाळू नाटेकर, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, युवा उद्योजक प्रीतम गावडे, भाजपा किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, युवा मोर्चा शहराध्यक्ष ललित चव्हाण, शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख नीलम शिंदे, युवती जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, आशा वळपी, अंजना सामंत, राणी पराडकर, लुईन फर्नांडिस, क्रांती धुरी, मधुरा तुळसकर, राजू बिडये, पराग खोत, दीपक धुरी, तोडणकर खवणेकर, यांसह तुळशीदास गोवेकर, बाबू धुरी, गणेश परब, भाऊ मोरजे, सुशील शेडगे, यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत असलेल्या शिवछत्रपतींच्या आणि त्यांच्या मर्द मावळ्यांच्या अथक परिश्रमातून निर्माण झालेल्या हिंदवी स्वराज्य निर्मितीची वैभवशाली कथा शिवपूर्व काळापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंतच्या अनेक प्रसंगाच्या नाटकातून सादरीकरण म्हणजेच “शिवायन ऐतिहासिक महानाट्य” छत्रपती शिवाजी महाराजांचे एकूण आयुष्यच नाट्यमय प्रसंगांनी भरलेले आणि भारलेले आहे. मातृप्रेम, पितृप्रेम, स्त्रियांच्या आदर, प्रखर राष्ट्रभक्ती, माणसाला माणूस म्हणून वागवण्याची प्रवृत्ती, गुन्ह्याला कठोर शासन आणि योग्य धाडसाला कौतुकाची थाप ही शिवशाहीची बीज आज समाजात रुजवणे आवश्यक आहे.

शिवायन या ऐतिहासिक महानाट्यासाठी ७२ फूट व ४० फूट भव्यरंग मंच व किल्ल्याचे भव्य नेपथ्य साकारण्यात येणार आहे. ४०० फूट व ४०० फूट भव्य प्रेक्षागृहासह १०० पेक्षा अधिक कलाकारांचा या महानाट्यमध्ये सहभाग असणार आहे. अत्याधुनिक ध्वनी आणि प्रकाश योजना आकर्षक व नेत्र दीपक आकाशवाणी, उत्कृष्ट संगीताने सजलेले महानाट्य, एकाच वेळी किमान आठ ते दहा हजार प्रेक्षकसंख्या, अभिजात आणि सर्वप्रमुख लोककलांचा सहभाग, श्री भवानी देवीची मूर्ती, आकर्षक सिंहासन व इतर नेपथ्य अशी अनेक वैशिष्ट्ये या महानाट्याची आहेत. या महानाट्य मध्ये घोडे, उंट, बैलगाडी यांचा प्रत्यक्ष वापर केला जाणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. शिवपूर्व काळाचे राज्याभिषेकापर्यंतच्या अनेक प्रसंगाची सादरीकरण या महानाट्यातून होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा