*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*महिला*🌹
सोनं पाऊली किरणं
येई अंगणी धावतं
क्षणातचं मन तिचं
कसं माहेरी पळतं
पाणी तुळशीला घाली
पुजीते पिंपळ पार
उंबरठ्याला हळदी कुंकु
तिचा सुखाचा संसार
कसं उरकु कामाला
लक्ष काही ना लागतं
धन्य धन्य स्त्री जातं
दोन्ही कुळाना जपतं
घरा घरपणं देते
जिवंतपणा राखते
वेल चढते मंडपी
दोन्ही कुळा उद्धरते
तिच्या स्पर्शात वात्सल्य
तिच्या त्यागात निस्वार्थ
बहिणीचा प्रेमळपणा
तिच्या जगण्याला अर्थ
तिचं असणं घरात
जणु लक्ष्मीचं रुप
घरा दाराला मीळुदे
तिचा सहवास खुप
तिचा सुखाचा संसार
पाणी घाली तुळशीला
आयुष्य मागते सदा
तिच्या हळदी कुंकवाला
*शीला पाटील. चांदवड.*