You are currently viewing भांडुप येथे ऑनलाईन सुंदर हस्ताक्षर स्पर्धेच्या विजेत्यांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

भांडुप येथे ऑनलाईन सुंदर हस्ताक्षर स्पर्धेच्या विजेत्यांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स डेव्हलपमेंट (टीआईएसडी) यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सुंदर हस्ताक्षर स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळा भांडुप येथील सह्याद्री विद्यामंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेला देशभरातून ५०४ स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मार्गदर्शक विशाल वाघमारे (सहायक पोलीस निरीक्षक, विशेष शाखा, मुंबई), राहूल पवार, छाया खोडके आणि आर्मी रिटायर्ड डी.डी. शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादनाने केली. त्यानंतर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करत कार्यक्रमाची अधिकृत सुरुवात झाली.

टीआईएसडीच्या वतीने आयोजित या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या लेखनकलेला प्रोत्साहन मिळाले असून संविधानाच्या उद्दिष्टांप्रती जागृती होण्यासाठीही हा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे. प्रमुख पाहुण्यांनी टीआयएसडीच्या कार्याचा गौरव करत भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबविण्याची सदिच्छा व्यक्त केली.

*स्पर्धेतील विजेते स्पर्धक:-*

*पहिला गट (३री ते ६ वी):-*

प्रथम क्रमांक: संचित वसंत ढगे

द्वितीय क्रमांक: सोहम किशोर जाधव

तृतीय क्रमांक: पृथ्वीराज प्रमोद खेमनर

उत्तेजनार्थ:-

चित्राली उमेश राऊळ

अर्णव राजेंद्र वानखेडे

काव्या प्रवीण कराळे

 

*दुसरा गट (७वी ते १०वी):-*

प्रथम क्रमांक: अपूर्वा रुपेश नलवडे

द्वितीय क्रमांक: साक्षी सचिन वीर

तृतीय क्रमांक: स्वयंम विनय पाटील

उत्तेजनार्थ:-

सोहन सदाशिव कुंभार

साक्षी रामचंद्र कवठेकर

राज प्रमोद कांबिरे

आर्यन अधिक मांडवेकर

श्रावणी आनंदराव निकम

आर्या निलेश तेलगे

प्रणय पवनकुमार डवंगे

गौरी दत्तात्रय पवार

अर्जुन पूजा हर्षद चव्हाण

 

*खुला गट:-*

प्रथम क्रमांक: सुभाष बन्सी साळवे

द्वितीय क्रमांक: वैभवी विनित गावडे

तृतीय क्रमांक: अनिल शहादराव त्रिभुवन

उत्तेजनार्थ:-

विक्रम केरू पारखे

निशा श्रीपाल जाधव

भोसले संतोष भगवान

वीणा रुपेश होळकर

सुनिल‌ जुलाल सोनवणे

ममता दिलीप मोरे

धनराज रघुनाथ दुर्योधन

गौतम अशोकजी शेंडे

विनोद गोविंदा सोनुने

अरुण शंकर जाधव

अविराज यशवंत गोरीवले

पूजा हर्षद चव्हाण

 

स्पर्धेतील विजेत्यांनी टीआयएसडीच्या संकल्पनेचे कौतुक करत अशा उपक्रमांची देशपातळीवर अंमलबजावणी करण्याची विनंती केली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी टीआयएसडीच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक कार्यकर्ते, संविधानप्रेमी आणि नागरिकांचे मोठे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. तसेच, प्रदीप मुंडे आणि चेतन बनसोडे यांचे अल्पोपहार व्यवस्थेसाठी विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा