मालवण : तालुक्यातील पर्यटन गाव जगाच्या नकाशावर असताना सुस्थितीत असलेला तारकर्ली प्रजिमा २८ रस्ता दोन्हीं बाजूंनी जल जीवन मिशन खात्याने आणि भूमिगत विद्युत वहिनी टाकण्यासाठी खोदलेला आहे. तसेच जी सी पी यांनी पूर्ण रस्ताच खराब केला तो त्वरित जसा होता त्याच स्थितीत ३१ मार्च पूर्वी पूर्ण करावा अशी मागणी भाजप कोकण विकास आघाडी मुंबईचे सचिव आणि तारकर्लीचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापर्डेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सुरेश बापर्डेकर पुढे म्हणाले की,तारकर्ली गावी आमचे देशाचे पंतप्रधान मां नरेंद्र मोदी साहेब देशाचा नेव्ही डे निमित्त औचित्य साधून व मालवण मध्ये आमचे आराध्य दैवत छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याकरिता आले होते त्यावेळी त्यांचे आगमन तारकर्ली समुद्र किनारी होणार आणि त्यांना तारकर्ली गावाचे रस्ते अगदी टापटीप केल्यासारखे दिसून यावेत .असा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग मालवण यांनी त्वरित बनविला . त्या कार्यक्रमाची सांगता करण्यास आलेले देशाचे आणि राज्याचे मंत्री महोदय खुश व्हावे याकरिता तात्पुरती तारकर्ली रस्त्याची मलमपट्टी करून त्यांच्या सोबत तारकर्ली वाहन चालकांना, पर्यटकांना आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना काही दिवसांसाठी आनंदी समाधानी करून या सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी स्वतःच समाधान केलं.परंतु त्या नेव्ही डे कार्यक्रम नंतर काही दिवसातच जलजीवन मिशन आणि आत्ता महावितरण विद्युत मंडळ मालवण यांना रस्ता खोदण्यासाठी परवानगी दिली.त्यांनी तो रस्त्याच्या दोन्हीं बाजूंनी खोदलेला रस्ता अद्याप जशास तसा न करता दोन्ही बाजूचा रस्ता सद्या कित्येक महिने तसाच अपूर्ण ठेवलेला आहे. साईटने खोदल्यानी वाहन दोन्ही त्या कडेला रुतत आहेत .तरी त्यापूर्वी सारखा खोदून मोठे काळे दगड टाकल्यावर संपूर्ण केळबाई ते तारकर्ली देवबाग रस्ता हॉट मिट करण्यात यावा अन्यथा पुढील पाऊस रस्ता खड्डेमय दिसेल. प्रत्यक्ष पाहणी करून रस्ता जैसे थे करावा अन्यथा नागरिकांना रस्त्यावर उतरायला भाग पाडू नये. जर दोघांचेही कामे पूर्ण झाली असतील तर वेळ कशाला लावत आहेत. अगर जेवढ काम झाले ते त्वरित करण्यात यावे. ते म्हणतात आमचं नाही आणि हे जल जीवन मिशन ठेकेदार आणि अधिकारी एकमेकावर बोट दाखवत नागरिकांना जो तारकर्ली रस्ता दोनही बाजूंनी गेली वर्षांनुवर्षे असा रस्ता झाला नाही तो झाला त्याची अतिशय दुर्दशा होऊन दोन्ही बाजूंनी रस्ता खचला असून वारोवार अधून मधून या तारकर्ली रस्त्यावर अपघात होत आहेत.
या यांच्या गलथान कारभाराचा नागरिकांना मनस्ताप होऊन छोट्या मोठ्या गाड्यांना त्यांनी खोदलेल्या खड्ड्यात वाळूत उतरल्याने छोटे मोठे अपघात होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.याला जबाबदार कोण सार्वजनिक बांधकाम विभाग की जल जीवन मिशन की विद्युत मंडळ विभाग याबाबत नागरिक आणि ग्रामस्थ यांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. देवी केळबाई मंदिर ते तारकर्ली रस्ता काही वर्षा नंतर बनविला आणि तोच रस्ता मुदतीपूर्वी हॉट मिट डांबरीकरण आणि क्रॉक्रीटी करन केलेलं नादुरुस्त झाला असता तो बनून घेण्याची कृतज्ञनता सार्वजनिक बांधकाम विभाग मालवण यांनी त्वरित दाखवावी. प्रजीमा २८ तारकर्ली रस्ता आणि रस्त्याच्या दोन्ही कडेला लावलेल्या लाईट ब्लॉक (कट आय) मुळे रस्त्याला इतकी शोभा आलेली यावरून कित्येक वर्षे अशा प्रकारचा तारकर्ली रस्ता झालाच नाही असा रात्री अपरात्री ये जा करणाऱ्या नागरिकांना आणि पर्यटकांना भुरळ पडलेली असा तारकर्ली रस्ता तोच रस्ता खोदून संपूर्ण रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्याच बरोबर तारकर्ली गावाचं नाव धुळीला मिळाले आहे.यावरून असे वाटते की तारकर्ली गावी देशाचे मंत्रीं महोदय ,राज्याचे मंत्रीमहोदय महिन्यातून एक फेरी मारली तरच प्रत्येक गावचे काय तालुक्याचे काय जिल्ह्याचे रस्ते सुरळीत गुळगुळीत असतील आणि सर्व समाधानी होऊन चालतील आणि पर्यटक,ग्रामस्थ आपली वाहने न डगमगता रस्त्यावर चालवतील.
पुढे पावसाळा येत आहे आणि आता होत आहे त्यापेक्षा जास्त अपघात आणि मनस्ताप वाहन चालक वाहन आणि नागरिकांना होऊ नये याकरिता मी ३१ मार्च ही डेड लाईन देत आहे.त्यानंतर कोणतेही सबब कारण कोणाचेही ऐकून घेतले जाणार नाही. पावसाळ्याची अगर कोण कसा रस्ता बनविणार याची सार्वजनिक बांधकाम मालवण खात्याने वाट न बघता आपण स्वतः या देवी केळबाई मंदिर ते तारकर्ली रस्त्याचे चांगले जाड्या काळा दगड यांनी खडीकरण करून हॉट मिट डांबरीकरण करून जशास तसे नागरिकांना मुद्दतीत रस्ता करावा याची आगाऊ सूचना या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सुरेश बापर्डेकर यांनी म्हंटले आहे.
