*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कटूसत्य*
*********
जन्मच सारा हा गुंतागुंतीचा
न बोलताच इथे जगावे लागते
कधी सुखदा तर कधी दुःखदा
अप्रिया देखील सोसावे लागते….
विधिलिखित भाळीच्याच रेखा
तळहातावरचे ते प्रारब्ध सांगते
कर्म , गतजन्मांचेच अधोरेखित
बिनबोभाट इथे भोगावे लागते….
कधी दुर्दैवाची दुर्दैवीच सावली
जीवाला सदैव छळतची रहाते
मोहमायाजाली इथे जीव गुंतता
कटुसत्याही कवटाळावे लागते….
केवळ येणे जाणे सत्य हे अटळ
आत्म्यासही या उमगलेले असते
परी जन्मच सारा हा गुंतागुंतीचा
न बोलताच इथे जगावेच लागते….
***********************
*©️वि.ग.सातपुते. ( भावकवी )*