*जागतिक महिला दिनाच्या औचित्याने व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल यांच्या वतीने धवडकी महाविद्यालयात किशोरवयीन विद्यार्थांसाठी आरोग्यविषयक कार्यक्रम*
सावंतवाडी
शनैश्र्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल ता. सावंतवाडी च्या वतीने ८ मार्च २०२५ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सद्गुरू साटम महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित धवडकी हायस्कूल मध्ये किशोरवयीन विद्यार्थांसाठी आरोग्यविषयक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
मासिक पाळी विषयी समाजात असणारे गैरसमज, शारीरिक आणि मानसिक बदल आणि घ्याव्या लागणारी स्वच्छता विषयक काळजी आणि व्यवस्थापन याविषयक किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष बी फार्मसी च्या विद्यार्थांनी पथनाट्याचे सादरीकरण केले. तसेच महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी मार्फत सॅनिटरी पॅड चे मोफत वाटप करण्यात आले.
सदरील कार्यक्रमास धवडकी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री रामप्रसाद गोसावी, आंबोली केंद्रप्रमुख श्री बी आर गावडे , श्री अंकुश सांगेलकर, प्राथमिक शिक्षक श्री चोपडे यांनी शुभेच्या दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.संजीव मोहिते सर यांनी केले.
कार्यक्रम समन्वयक म्हणून व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी च्या सहप्राध्यापिका सौ. आर्या तानावडे यांनी विद्यार्थीनींना आरोग्य विषयक मोलाचे मार्गदर्शन करून मुलींचे समज गैरसमज दूर केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कॉलेजच्या सहप्राध्यापिका सिद्धी खानोलकर यांनी केले.
सदरील कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी पंकज पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील शिंगाडे आणि विभागप्रमुख डॉ. संदेश सोमनाचे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कार्यशस्वीते बद्दल शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे आधारस्तंभ व माजी कुलगुरू डॉ. वेदप्रकाश पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार डॉ. राहुल पाटील यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.