You are currently viewing सामाजिक व राजकीय क्षेत्रात स्रियांचे योगदान

सामाजिक व राजकीय क्षेत्रात स्रियांचे योगदान

*लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासिका लेखिका कवयित्री पल्लवी उमरे.. शब्दवैभवी..लिखित अप्रतिम लेख*

 

# सामाजिक व राजकीय क्षेत्रात स्रियांचे योगदान

 

“जिच्या हाती पाळण्याची दोरी ,

ती जगाते उद्धारी “या उक्तीप्रमाणे संसारापासून जरी स्त्रीच्या आयुष्याची सुरुवात होत असली तरी स्वतःचे घरदार संसार सांभाळून आज सगळ्याच क्षेत्रात तिने आपले अस्तित्व सिद्ध केले आहे एका स्त्रीला आपल्या संसाराची घडी जशी नीट बसवता येते त्याचप्रमाणे सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक क्रीडा अगदी सर्व क्षेत्रात तिने फिनिक्स भरारी घेतली आहे.

भारतात पंचायत राज्याची संकल्पना राबविली गेली प्रत्येक ठिकाणी स्त्रियांना 30 टक्के आरक्षण दिल्या गेले स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन दिल्या गेले त्यामुळे पुढील मार्ग स्त्रियांना सुखकर झाला अर्थात याचे श्रेय स्त्री शिक्षणाचा पाया ज्यांनी रचला स्त्रियांचे बोट धरून शिक्षणाची कवाडे ज्यांनी उघडली ते महान व्यक्ती ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना जाते. स्वतः अनेक अत्याचार सहन करीत शेण मातीचे गोळे झेलत सावित्रीच्या लेकींना घडवण्यात ज्या ज्या महात्म्यांनी आपले आयुष्य खर्च केले त्यांचे अनंत उपकार आहेत आम्हा स्त्रियांवर .ज्या काळात स्त्री शिक्षणाचा बाऊ केल्या जायचा त्या काळात त्यांनी डॉक्टर होण्याची स्वप्न पाहिले त्या डॉ.आनंदी जोशी यांचे नाव आजही कायम स्मरणात राहील. जिजाबाई ,अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई राणी दुर्गावती, राणी पद्मावती, इत्यादी.

 

निर्मला सीतारामन ,भारताच्या अर्थमंत्री आहेत. इंदिरा गांधी भारताच्या प्रधानमंत्री होऊन गेल्या. देशासाठी त्या वडिल पंडित नेहरू सोबत सक्रिय होत्या. सरोजिनी नायडू याही राजकारणात सक्रिय होत्या आजही त्यांचे नाव सन्मानाने घेतले जाते. स्वातंत्र्योत्तर काळात अशा स्त्रियांची संख्या फार कमी होती जसजशी शैक्षणिक प्रगती होत गेली तस तशा स्त्रिया आत्मनिर्भर होत गेल्या. त्यांना आपल्या हक्काची जाणीव होऊ लागली आणि स्त्री घराबाहेर पडून नोकरी करू लागली. कित्येक भारतीय महिला आय ए एस आय,आरएस होऊन कलेक्टर इन्कम टॅक्स कमिशनर भारतीय राजदूत, दुतावास परराष्ट्रमंत्री, लोकसभा राज्यसभासारखी पुरुषी हुद्यांची क्षेत्रही गाजवत आहेत असे कुठलेही क्षेत्र नाही जिथे महिलांनी शिरकाव केलेला नाही भारताच्या राष्ट्रपती , प्रतिभाताई पाटील नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेघाताई पाटकर अनेक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्तुत्ववान स्त्रिया इन्फोसिसच्या चेअरपर्सन

सुधामुर्ती ,आय,सी आयसी आय बॅंकेच्या चंदा कोचर, समाजसेविका मदर टेरेसा राजकीय क्षेत्रातही आज बऱ्याच स्त्रिया यशस्वीपणे धुरा सांभाळत आहेत .पोलीस खात्यात आपल्या कडक स्वभावाने कारकीर्द गाजवणाऱ्या महिला पोलीस अधिकारी किरण बेदी, याही क्षेत्रात आज बऱ्याच स्त्रिया कार्यरत आहेत

भारताच्या तत्कालीन राष्ट्पती द्रौपदी मूर्मू

सर्वोच्च पदी विराजमान आहेत. या खऱ्या अर्थाने आजच्या युगातील दुर्गा आहेत.

 

अशिक्षित असूनही अनाथांची माय होणाऱ्या माई सिंधुताई सपकाळ यांचे विशेष कार्यही उल्लेखनीय .कल्पना चावला सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात जाऊन विशेष कामगिरी बजावली क्रिडा क्षेत्रात क्रिकेट पासून बॉक्सिंग पर्यंत सर्व खेळात बिकट परिस्थितीत महिला झेप घेत आहेत मेरी कोमने बॉक्सिंग मध्ये आपले कर्तृत्व केव्हाच सिद्ध केले आहे .सानिया मिर्झा , सायना नेहवाल बॅडमिंटन पी व्ही सिंधू मिताली राज क्रिकेटपटू, मीराबाई चनू या सर्वांनी ऑलिंपिक मध्ये पदके मिळवलेली आहेत. बच्छेंद्री पाॅल, अरूणीमा सिन्हा,या अपंग असूनही स्वतः च्या इच्छाशक्तीच्या बळावर एव्हरेस्ट सर केले,आणि अनेक पदकांच्या मानकरी ठरल्या.भारतीय महिला क्रिकेट टिम देशविदेशात नावलौकिक मिळवत आहेत.अशा या दुर्गा रूपी मातृ शक्तीला त्रिवार वंदन.

 

अशा प्रकारे सगळ्या क्षेत्रात अग्रेसर होत आपल्या भारतीय महिला उत्तुंग भरारी घेत आहेत. देशाच्या लढाईत आपले मोलाचे योगदान देत आहेत आपपला भार उत्तम सांभाळत देशाचे नाव, जगभर उंचावत आहेत. .जय हिंद जय भारत.

©®शब्द वैभवी पल्लवी उमरे

मुंबई ९७६६०७६४२४

प्रतिक्रिया व्यक्त करा