*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अंजना कर्णिक लिखित अप्रतिम काव्यरचना*
*ती…*
ती हसतच तुमच्या सोबत
राहते
दुःखाचे कढ आतल्याआत
जिरवते
राहते झराझर सारी कामे
उरकते
गुणगुणते काही स्वतःला
रिझवते
संकटाचे इशारे वेळीच
ओळखते
ती तिच्याही नकळत सिद्ध
राहते
अस्वस्थ मनाने बालपण
आठवते
मात्र संसारात रमते तोल
सांभाळते
कधी मनाविरुद्ध तडजोडी
करते
नकोशी माणसंही राहते
सोसते
मायेची शाल तुमच्यावर
पांघरते
अन्यायाचे काटे पदराआड
लपवते
आजन्म आईपणात मुरते
बुडते
ती पदरात लेकरांची दुःख
झेलते
हाताश होते जरी ती तरीही
लढते
तिच्या संस्कार बिजाचे रोप
तरारते
नात्यांच्या अनेक रंगात ती
रंगते
तीला डावलणाऱ्याची वाट
चुकते
आधाराला कुठे कोण मग
उरते
आईवीणा बालपण अवघ
मिटते
‘ती’ अन्नपूर्णा,लक्ष्मी, दुर्गा
असते
🖊️@अंजना कर्णिक