*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे सदस्य कवी सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*महिला उत्कर्ष दिन*
विधाता नैसर्गिक सुखाचा दाता
अखंडित अविरत प्रवाहित |
सुखाचे या रहस्य ठेवून गुप्त
हृदयात साठविले सुरक्षित ||१||
शोधता शोधता ते थकून जाता
थकून बसता दिसे अंतरात|
का निसर्गाने सुप्त केले सुखाला
विद्यांचे केंद्र अन् गुरु अंतरात ||२||
स्त्री पुरुष या निर्मिल्या दोन जाती
का त्यात भरली जात खत माती |
पोसल्या जातीच या जगरहाटी
खंगे मानवता सर्वधर्मजाती ||३||
निसर्गाकडे पहा जाणतो हित
त्याने सोडली का नित धर्म रीत
त्याने केलं असतं स्त्रिला पुरुष
असता साकारला पुरुष स्त्रीत ||४||
स्त्रिला निसर्गाचं संवर्धन देत
दिले गुणांचे वरदान सुखात
ती नम्र शालीन जबाबदारीत
पाळते कर्तव्य ते धर्म हितात ||५||
तिने सर्व सोडले काय होईल
कल्पना करू नको होशील गार
मग तिच्याशिवाय उरेल काय
विश्वाचा आधारच होईल ठार ||६||
म्हणून म्हणतो द्या तिला संस्कार
शिक्षण रक्षण होऊ द्या पूजन
समृद्ध प्रेमळ लाभू द्या जननी
अलभ्य लाभ मानवा उद्धारुन ||७||
सक्षम समृद्ध शालीन शूर प्रेमळ स्वसंरक्षक
इतरांच्या गुणांचा सन्मान करणाऱ्या दुर्गुणांचा धैर्याने सामना करणाऱ्या आणि महिलांचाही महिला असून तिरस्कार न करता आदराने वागून स्वकुटुंब संस्कार, रक्षण आणि जतन करता करता इतरांना सहाय्य करणाऱ्या सर्व सर्व विश्ववन्द्य माउलींना सप्रेम आदरपूर्वक कोटी कोटी प्रणाम! शक्ती भक्ती मुक्ती युक्ती शास्त्र शिस्त शस्त्र अस्त्र विद्या आणि या
सर्वांसोबत निरक्षीरविवेक संपन्नता हे आपल्या कर्तव्याने दिलेले अधिकार आहेत ते आपणास लाभोत हिच सदिच्छा व्यक्त करून महिला दिनाच्या खूप खूप अंतर्मनःपूर्वक सर्वांना शुभेच्छा देतो.
धन्यवाद!
शुभम् भवतु!
कवी :- श्री सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे.
फणसखोल, आसोली, ता.- वेंगुर्ला,
जि.- सिंधुदुर्ग, राज्य – महाराष्ट्र.
🪷🙏🏻🪷