*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*
*आदी शक्तीची अनंत रूपे..*
आदी माया आदी शक्ती तु,
जगन्माता जगत्जननी तू.
सृजनकर्ती सृष्टी तूच,
वत्सलमुर्ती वसुंधराच तू.
वैदिक काळात गाजलीस,
मैत्रेयी गार्गी ही तुझीच गं रूपे
बुद्धीमत्तेत सर्वांना जिंकलंस.
पुराणातही जानकी द्रौपदी, मंदोदरा, अहिल्या शबरी सगळ्यात साक्षात तूच तर होतीस,
कौसल्या सुमित्रा कुंती वेगळ्या नाहीतच.
संत पदी पोंचणारी मुक्ताई जनाई कान्होपात्रा तूच ना ग!
न शिकता कविता करून गाणारी बहिणाई तर तूंच!
लढणारी झुंझार जिजाई झांसीची राणी तारामती अहिल्यादेवी तूच,
लेकींना शिकवुन क्रांती करत समाजाशी भिडणारी तूंच ना सावित्री, फातिमा,रमाई लक्ष्मीबाई,
साहित्य गंगेतील शामची आई, गडकरींची सोशिक कुटूंब वत्सल सिंधू तूच,
शिकण्यासाठी समुद्रापार गेलेली डॉ. आनंदी बाई तुच गं!
विज्ञानात मुसंडी मारत अग्रस्थानी तूच गं संशोधक, व्याख्याती, लेखिका कवयत्री.
सौंदर्यातही मधुबाला मस्तानी म्हणुन गौरवलीस तू.
चारित्यासाठी जौहार करणारी तूच होतीस ती राजस्थानी स्त्री,
राजकारणात बोलती बंद करणारी मृणाल इंदिरा, सुषमा तूच तर गर्जत होतीस.
अंतराळात धोक्याची पर्वा न करता गेलेली सुनिता कल्पना तूच की,
कलाक्षेत्र, विज्ञान अभ्यास संशोधन, साहित्य अध्यापन तंत्र मशीन कोणत्या क्षेत्रात तू गाजली नाहीस?
गौरवली नाहीस?
हंसत होतीस मैत्रीण बनुन,
धीर देत होतीस बहिण बनुन,
मार्ग दाखवत होतीस शिक्षक बनुन,
तशी माहेरी लाड कोतुक करून घेत होतीस तर सासरी दक्ष रहात होतीस.
मायापाशात गुंतलीस घरपणात रंगलीस कचेरीत रमलीस जग बघायला हिंडलीस कर्तव्य बजावताना कठोर झालीस सेवा करताना करूणेचा सागर झालीस, स्त्रीत्वाचा अपमान करणार्यांसाठी रणरागिणी ठरलीस
अगं!शक्तीमाते किती आणि कशी रूपे घेत आलीस त्या आदी काळापासुन?
नारी एकलीच तू!
शक्ती तुझ्यातली तूच,
दाखवत अनंत रूपे एकवटलीस मात्र
मातृरूपात तू!
रमलीस आनंदी झालीस सुखावलीस तृप्त झालीस,
सर्वांवर भारी पडलीस तू तरिही
शेवटी जगन्माता म्हणुनी गौरवलीस तूं.
अनुराधा जोशी.
अंधेरी मुं. 69.
9820023605