*मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा गर्जे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*झेप उंच तू घेई*
विस्तीर्ण तुझे आकाश हे
झेप उंच तू घेई
तूच शारदा, तूच दुर्गा,
तूच भवानी आई…..
बोल हे असती बहू मोलाचे
स्त्री शक्ती जाणूनी घेई
याच शक्तीपीठा समोरी
जग नतमस्तक होई….
धरतीची शय्या करुनी
दगड उशाशी घेई
पांघरण्या आकाश बाकी
हवे कशाला काही…..
पंखामधला जोर तुझ्या
तूच जोखूनी पाही
कोषामधुनी बाहेर ये तू
उंच भरारी घेई
झेप उंच तू घेई….
– अरुणा गर्जे
नांदेड
