You are currently viewing स्वयंसिद्धा नारी तू

स्वयंसिद्धा नारी तू

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*स्वयंसिद्धा नारी तू*

 

बंदिस्त रुढी परंपरेतून

नारी जाती मुक्त जाहली

अबला नारीपेक्षा आजची

नारी सबला सशक्त वाटली

 

चूल अन् मूल जुनी कल्पना

अन्यायाविरुद्ध लढते नारी

कणकण साठवून घर भरते

म्हणुनी तिला म्हणती संसारी

 

पदर खोचूनी कमरेला बघ

तिने उद्योगाची कास धरिली

नोकऱ्यांमध्ये उच्चपदांची

जागा हमखास तिने हरिली

 

स्वकर्तृत्वाच्या जोरावरती

स्वयंसिद्धा तू बनलीस खरी

पुरुषांच्या खांद्याला खांदा

मिळवून घेतली उंच भरारी

 

नारी नाही राहिली अबला

बनली स्त्रीशक्तीचा हुंकार

करुनी सन्मान उंचवा मान

समाजास माझी एक पुकार

 

©दीपक पटेकर (दीपी)

सावंतवाडी

८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा