You are currently viewing “बाल स्नेही 2024 – उत्कृष्ट बाल कल्याण समिती” पुरस्काराने सिंधुदुर्ग कोकण विभागाचा विशेष सन्मान

“बाल स्नेही 2024 – उत्कृष्ट बाल कल्याण समिती” पुरस्काराने सिंधुदुर्ग कोकण विभागाचा विशेष सन्मान

सिंधुदुर्ग :

दिनांक 3 मार्च 2025 राेजी ऍड. प्रा. अरुण पणदूरकर हे Bench of Magistrate असलेल्या बाल कल्याण समिती सिंधुदुर्ग ला “बाल स्नेही 2024 – उत्कृष्ट बाल कल्याण समिती ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

बाल कल्याणाच्या कार्यात CWC – Child Welfare Committee च्या माध्यमातून केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल ऍड. सुशीबेन शाह, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांच्या हस्ते व मा. कु. आदिती तटकरे (मंत्री महिला व बाल विकास विभाग) व मा. श्रीमती मेघना बोडीकर (राज्य मंत्री महिला व बाल विकास विभाग) ” यांच्या प्रमुख उपस्थितीत हा खास कार्यक्रम, यशवंतरावं चव्हाण सेंटर, नरीमन पॉईंट, मुंबई येथे संपन्न झाला.

या खास कार्यक्रम तर्फे महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई यांनी आयोजित केलेला होता.

मुलांच्या संरक्षण व काळजी संबंधित उत्कृष्ट कार्य करण्यासंबंधी हा पुरस्कार असल्याने…..”बाल स्नेही 2024 – उत्कृष्ट बाल कल्याण समिती” हा विशेष सत्कार मानाचा समजला जातो.

*या विशेष पुरस्काराबद्दल ऍड. प्रा. अरुण पणदूरकर यांनी पुरस्कार निवड समिती व महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत व आपले मुलांच्या संरक्षण व काळजी संबधी Bench of Magistrate च्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्याचा घेतलेला वसा असाचा पुढे चालू ठेवण्याचे अभिवचन दिलेले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा