भारतरन्त डॉ. एपीजे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा 9 मार्च रोजी
सिंधुदुर्गनगरी
जिल्हा परिषद सिंधुदुर्गमार्फत आयोजित भारतरन्त डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा रविवार 9 मार्च 2025 रोजी जिल्ह्यातील एकूण 40 परीक्षा केंद्रावर संपन्न होणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. गणपती कमळकर यांनी दिली आहे.
भारतरन्त डॉ. एपीजे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षासाठी इयत्ता चौथीची 21 परीक्षा केंद्र व सातवीची 19 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आलेली आहेत. ही परीक्षा मराठी, उर्दू व सेमी इंग्रजी माध्यमातून होणार आहे, पेपर क्रमांक 1 वेळ सकाळी 11 ते 12.30 वाजता तर पेपर क्रमांक 2 वेळ दुपारी 2 ते 3.30 अशी असणार आहे. या परीक्षेसाठी इयत्ता चौथी मधून 5 हजार 100 विद्यार्थी आणि सातवी मधून 2 हजार 207 विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. परीक्षेला प्रविष्ट झालेलया विद्यार्थ्यांनी त्या – त्या केंद्रावर सकाळी 10 वाजता उपस्थित राहावयाचे आहे.
इयत्ता पाचवी व आठवीच्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी व्हावी, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाचा व परीक्षांचा सराव व्हावा, स्पर्धात्मक अभ्यासाची सवय लगावी, विद्यार्थ्यांच्या ज्ञानात अधिक भर पडावी, तसचे सिंधुदुर्ग जिल्हा परिदेच्या शाळांची पटसंख्या वाढावी या हेतूनू सन 2018 पासून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमार्फत भारतरत्न डॉक्टर एपीजे अव्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन करण्यात येत. परीक्षेला नाव नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेला प्रविष्ट व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे.
