You are currently viewing मराठा समाज आयोजित कमर्शिअल व्हेईकल एक्स्पो उद्या शनिवारी सावंतवाडीत उपस्थित राहावे – सकल मराठा समाज अध्यक्ष सिताराम गावडे

मराठा समाज आयोजित कमर्शिअल व्हेईकल एक्स्पो उद्या शनिवारी सावंतवाडीत उपस्थित राहावे – सकल मराठा समाज अध्यक्ष सिताराम गावडे

मराठा समाज आयोजित कमर्शिअल व्हेईकल एक्स्पो उद्या शनिवारी सावंतवाडीत उपस्थित राहावे – सकल मराठा समाज अध्यक्ष सिताराम गावडे

सावंतवाडी
अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गच्या आणि सिंधू विकास संशोधन व कौशल्य विकास संस्था कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कमर्शियल व्हेईकल एक्सपो २०२५ दि. ८, ९,व १० मार्च रोजी सावंतवाडी येथील जगन्नाथराव भोसले उद्यानासमोर आयोजित करण्यात आला आहे. या कमर्शियल व्हेईकल आयोजनाला मोठ्या संख्येने नवोद्योजक, उद्योजक, व मराठा समाजाबाबत बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सिताराम गावडे यांनी केले आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग व सिंधू विकास संशोधन व कौशल्य विकास संस्था कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने कमर्शियल व्हेईकल एक्सपो २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे .सदरचा कार्यक्रम जगन्नाथराव भोसले उद्यानासमोरील मोकळ्या जागेत संपन्न होणार आहे , उद्या शनिवार दि.८ मार्च रोजी सकाळी ९ वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग बँकेचे चेअरमन मनिष दळवी, महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो ट्रॅक्टर बस वाहतूक महासंघ मुंबईचे अध्यक्ष प्रकाश गवळी, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अँड सुहास सावंत ,सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले, माजी नगराध्यक्ष संजू परब उपस्थित राहणार आहेत.
या उद्योग महामेळाव्याचा लाभ समाजातील गरजू व्यक्तीनी व्यवसायिकांनी , नवउद्योजकांनी घ्यावा असे आवाहन सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सिताराम गावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा