*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा!
*”स्त्री आदर्श शक्ती”*
स्त्री जीवन सृष्टी नियतीचे वरदान
जीवनांत स्त्रीचे बहुमूल्य योगदानIIधृII
आतला आवाज ओळखावा स्त्रीशक्तीनं
राहते भवतालाचा तोल राखून सन्मान
सांभाळते विश्वाला सात्विक शक्तीनंII1II
सूर्यदेवाला शक्ती मिळते सवितेकडून
समुद्र जलापासून बनती मेघ या शक्तीनं
वैभव लक्ष्मी सरस्वती करी ती प्रदानII2II
दुष्टदुर्जनांचे महांकाली करी मर्दन
देई सामर्थ्य असुरांचे करी निर्दालन
समयोचीत स्त्रीधर्म सांभाळी ममत्वानंII3II
देवी देवतां आदींचे अनन्य योगदान
भाषा वाड्:मय केले स्त्रियांनी उच्च संपन्न
समृद्ध संस्कृतीची किर्त नेली गगनांतII4II
शील चारित्र्य सदाचार प्रेम वात्सल्य त्याग
देवी बहूभुजा बहूअवधानी कर्म निधान
जपते घराचे वैभव लक्ष्मी रूप लेऊनII5II
सर्व कर्मे निभावते राखते व्यवधान
राखी स्वच्छता अन्नपूर्णा पूरवी अन्न
सांभाळी आरोग्य पाहुणचार औचित्यपूर्णII6II
मातृपद स्वीकारी सांभाळी प्रजनन
माता गृहिणी सहचारिणी पत्नी बहीण
आदिशक्ती आदर्श संस्कृती वाढवी सन्मानII7II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.

