ग्रामसेवक युनियन डीएनई 136 शाखा कणकवलीचे प्रलंबित मागण्यासाठी धरणे आंदोलन
कणकवली
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई 136 तालुका शाखा कणकवली तालुक्याच्या वतीने प्रलंबित मागण्यासाठी आज ६ मार्च रोजी दोन तासाचे धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रशांत वर्दम जिल्हाध्यक्ष, देवेंद्र नलावडे राज्य कॉन्सिलर, वैभव धुमाळे तालुकाध्यक्ष, शशिकांत तांबे- तालुका उपाध्यक्ष, अर्चना लाड – तालुका महिला उपाध्यक्ष, वैभव ठाकूर – तालुका सचिव आणि कणकवली मधील सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत मा श्री. अरुण चव्हाण गटविकास अधिकारी वर्ग 1, मा. श्री. वालावलकर सहाय्यक गटविकास अधिकारी, मा श्री सूर्यकांत वारंग श्री. रामचंद्र शिंदे विस्तार अधिकारी यांचेकडे निवेदन देण्यात आले.
