You are currently viewing अखेर तारामुंबरी मिठमुंबरी सागरी सेतू वरून धावली लालपरी..

अखेर तारामुंबरी मिठमुंबरी सागरी सेतू वरून धावली लालपरी..

प्रवासी वर्गातून समाधान; पालकमंत्री नितेश राणे यांचे विशेष अभिनंदन

देवगड :

सिंधुदुर्ग पर्यटनाला महत्त्वाचा दुवा ठरलेला व दोन पर्यटन तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा असा तारामुंबरी मिठमुंबरी खाडीवरील फुल हा पर्यटनाचा सागरी सेतू म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र या पुलावरून सर्व वाहतूक सुरु झाली होती. उणीव होती ती फक्त प्रवासी एस टी वाहतुकीची. या पुलावरून लालपरी धावावी अशी गेले कित्येक वर्षांची मागणी होती. अखेर मागणीला सात वर्षांनी का होईना यश आले आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार लालपरी पर्यटनाच्या सागरी सेतू वरून धावली.

आज देवगड आगारातून तारामुंबरी मिठमुंबरी पुलावरून जाणाऱ्या देवगड कुणकेश्वर देवगड या एसटी प्रवासी फेरीचा शुभारंभ आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी स्थानक प्रमुख श्रीकांत सैतावडेकर वाहतूक नियंत्रण तुकाराम देवरुखकर चालक व्ही एस उन्हाळकर वाहक पी.पी.घाडी आदी प्रवासी उपस्थित होते.

या मार्गावरून सकाळी ९:३० वाजता देवगड कुणकेश्वर, ९:४५ कुणकेश्वर देवगड दुपारी १ वाजता देवगड कुणकेश्वर दुपारी १:१५ कुणकेश्वर देवगड सायंकाळी ५:३० देवगड कुणकेश्वर सायंकाळी ५:४५ कुणकेश्वर देवगड अशा एकूण तीन फेऱ्या सुरू करण्यात आले आहेत. या पुलावरून एसटी वाहतूक चालू झाल्याने प्रवासी फेरीचे तिकीट देखील कमी असल्याने आर्थिक बचत होणार आहे या फेरीच्या जास्तीत जास्त प्रवासी वर्गाने याचा लाभ घ्यावा असे आवाहन आगार व्यवस्थापक यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा