*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*नाही असार संसार….*
नाही संसार असार नाही संसार भिकार
तो तर सोन्याने मढविला
नवरा बायको नि, मुले पुजतात पाचविला..
टाक सटवाई दान, दान टाक कोणतेही
जपू जीवापाड त्यांना जाणतात जाणतेही
लागू देतनाही ऊन वारा भरारा पाऊस
अहो संसाराची किती, किती असते हाऊस…
बिलगते वेल जशी तशी बिलगे जीवलगा
आला हिमखंड तरी , तरी राहतो तो उभा
हात लावते हाताला मम म्हणते काहीही
कोसळला पहाड जरी उलटल्या दिशा दाही…
साथ जन्माची निभते कर्तव्यात ना कसूर
लागतात मुले मार्गी तेव्हा होतात निसूर
कोणी म्हणो मोहमाया कुणी म्हणो त्यास छाया
नवरा बायकोच्या साठी मात्र मधमधाळ त्या लाह्या…
समरसून करती जाती गुंतून ती मने किती राहती
सुखाने
उसवली जीवनात अशी कमीच दुकाने
कामातच आहे मोक्ष करा नेटाने संसार फक्त
सोडू नका नेकी
कर्म करावे अर्पावे सांगे सदा तो ॥पारखी॥…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

