*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आहे नावाची मी कल्याणी*
आवेग संपता चालू लागला
असून बेवडा जवळ *केला*
मध्य रात्रीची विसरून वेळ
मूर्ख म्हणून मी आसरा दिला…
कर्म माझे *फसवून* गेले
अर्थ न उरतो आता शोधाला
पुरुष समजून *सर्प* पाळला
पळून गेला *बाप* निघाला….
बसून राहिले *तासं तास*
नसून वस्त्रे होते *बिनधास्त*
नियत साल्याची असून वेगळी
होते त्याचे खानदान *स्वस्त*….
-हास मुल्यांचा चटकन होतो
स्त्री स्वभाव पटकन भुलतो
विश्वास ठेवतो *कुणाही वर*
*गोड गप्पांना बळी पडतो*……
कुठे विकणारे माझाच फोटो
*मूर्खात* काढेल त्याला जग
लिलाव स्वत:चा कोण मांडतो
नव्हते तेव्हाही मी *सजग*…..
कापून गळा *कलाकाराने*
ओढवून घेतली शापवाणी
नसून ईच्छा कुणा दुखवायची
आहे नावाची मी *कल्याणी*….
विनायक जोशी🖋️ ठाणे
मीलनध्वनी/9324324157