सावंतवाडी :
घे भरारी फाउंडेशन सावंतवाडीतर्फे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खास महिलांसाठी खेळ पैठणीचा या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले आहे. जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान येथे ७ मार्च रोजी सायं. ५ वा. या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या खेळ पैठणीचा कार्यक्रमात प्रथम पारितोषिक पैठणी साडी, द्वितीय व तृतीय आकर्षक साडी पारितोषिकात आहे. तर उपस्थित महिलांसाठी लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला आहे. तसेच फनी गेम्स आयोजित करण्यात आले आहेत. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थापक मोहीनी मडगावकर, अध्यक्ष गीता सावंत, उपाध्यक्षा शारदा गुरव, सचिव मेघना राऊळ, कार्याध्यक्षा रिया रेडीज, खजिनदार मेघना साळगावकर यांनी केले आहे.