You are currently viewing प्रथमच कोष्टीवाडी मित्रमंडळ वरवडेच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ३५ रक्तदात्यांनी केले रक्तदान..!

प्रथमच कोष्टीवाडी मित्रमंडळ वरवडेच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ३५ रक्तदात्यांनी केले रक्तदान..!

*प्रथमच कोष्टीवाडी मित्रमंडळ वरवडेच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ३५ रक्तदात्यांनी केले रक्तदान..!*

कणकवली

कोष्टीवाडी मित्रमंडळ वरवडे आयोजित व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आज प्राथमिक आरोग्य केंद्र वरवडे येथे रक्तदान शिबिर पार पाडले. कोष्टीवाडी मित्रमंडळ वरवडे गावाचा सांस्कृतिक आणि क्रीडा विषयक कामामध्ये असलेला सहभाग हा स्पृहणीय आहे. प्रथमच कोष्टीवाडी मित्रमंडळ वरवडेच्या तरुणांनी रक्तदान शिबिर आयोजित करून तरुण पिढीला एक चांगला संदेश दिला आहे. या शिबिरामध्ये 35 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच महिला रक्तदात्यांनी सहभाग घेतला. तसेच सर्व रक्तदात्यांना भेटवस्तू व प्रमाणपत्र गुलाबपुष्प देण्यात आले. या शिबिराची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करत झाली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र वरवडे वैद्यकीय अधिकारी डॉ. वळंजू मॅडम, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान कणकवली तालुकाध्यक्ष मकरंद सावंत, तालुका उपाध्यक्ष रुजाय फर्नांडिस, ओरोस रक्तपेढीचे डॉ. पल्लवी मॅडम, मंडळाचे अध्यक्ष श्री. विजय कडुलकर, उपाध्यक्ष श्री. प्रशांत सावंत, सचिव संदीप राणे, खजिनदार दर्शन पोयेकर, तसेच मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा