जागतिक महिला दिनानिमित्त छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस येथे कराटे व स्वसंरक्षण शिबिराचे आयोजन..
सिंधुदुर्ग
छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस, ओरोस येथे ८ मार्च रोजी सकाळी 9.30 वाजता एक दिवसीय कराटे व स्वसंरक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. सदर प्रशिक्षण हे निशुल्क आहे.
या शिबिरात सहभागींना कराटे, कर्व मागा ( इजरायली मार्शल आर्ट्स ), प्रभावी ब्लॉकिंग आणि एस्केपिंग स्ट्रॅटेजीज, परिस्थितीजन्य जागरूकता आणि वैयक्तिक सुरक्षा नियोजन यासारख्या आवश्यक स्वसंरक्षण कौशल्यांची ओळख करून देण्यात येईल.
महिलांना केवळ स्वतःचे संरक्षण करण्यासच नव्हे तर त्यांच्या दैनंदिन जीवनात अधिक सुरक्षित वाटण्यास सक्षम करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.
सिंधुदुर्गातील जास्तीत जास्त महिलांनी या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन माजी खासदार व सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान किर्लोसचे अध्यक्ष ब्रिगे. सुधीर सावंत, संस्थेचे उपाध्यक्ष श्री प्रदीप सावंत, संस्थेचे सचिव श्री शांताराम रावराणे व छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोसे प्राचार्य श्री. योगेश पेडणेकर यांनी केले आहे.
शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी प्राध्यापक लेफ्टनंट विवेक राणे (4th डिग्री ब्लॅक बेल्ट ) मोबा. 9404345424 यांच्याशी संपर्क साधावा.