You are currently viewing आडवली मालडी सरपंच, उपसरपंचासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेते प्रवेश

आडवली मालडी सरपंच, उपसरपंचासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेते प्रवेश

मालवण :

आमदार निलेश राणे यांच्या विकास कार्यामुळे प्रेरित होऊन मालवण तालुक्यातील आडवली मालडी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून पक्षप्रवेशाचा धडाका सुरू आहे. आडवली येथे शिवसेना आडवली मालडी जिल्हा परिषद मतदार संघ संपर्कप्रमुख विनायक बाईक यांच्या माध्यमातून हा पक्षप्रवेश झाला.

मालवण कुंभारमाठ येथील दत्ता सामंत यांच्या निवासस्थानी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत आणि अडवली येथील उभाठा शिवसेना पदाधिकारी अरविंद साटम, विनोद साटम, शाखाप्रमुख विष्णू घाडीगावकर यांच्या पुढाकारातून सरपंच संदीप आडवलकर, उपसरपंच भक्ती साटम, सदस्य सोनाली पराडकर ज्योती लाड, प्रमोद मसूरकर विजय कदम, हरिश्चंद्र सावंत, नितीन पराडकर, रसिका घाडीगावकर, तेजा घाडीगावकर, मीनल साटम, अस्मिता घाडीगावकर, सुशांत साटम, राकेश घाडीगावकर, महेश जाधव, समीर साटम, वैशाली घाडीगावकर, समिधा आडवलकर, कविता घाडीगावकर, अनिता घाडीगावकर, सुलोचना घाडीगावकर, रामचंद्र यादव, महेश पांचाळ, संभाजी साटम अमोल घाडी, नितीन घाडीगावकर, लक्ष्मण घाडीगावकर, अजित घाडीगावकर, अमोल कदम, योगेश कदम, सागर कदम, नितीन कदम, संदीप सावंत, रवींद्र मसुरकर, ओमप्रकाश मसुरकर, प्रथमेश साळकर, गंगाराम राणे, प्रशांत सावंत, मिलिंद मसुरकर, अमृता चव्हाण यांसह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी शिंदे शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगावकर, उपजिल्हाप्रमुख राजा गावडे, तालुकाप्रमुख महेश राणे, माजी नगरसेवक दीपक पाटकर, आडवली मालडी जिल्हा परिषद मतदार संघ संपर्कप्रमुख विनायक बाईत, विभाग प्रमुख सुनील घाडीगावकर, श्रावण माजी सरपंच प्रशांत परब, निलेश बाईत, जेरॉन फर्नांडिस, रुपेश पाटकर, दिलीप बिरमोळे, राजू बिडये, मंदार लुडबे, भाऊ मोरजे, युवा सेना जिल्हाप्रमुख मेहुल धुमाळे, ऋत्विक सामंत, युवती सेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, मधुरा तुळसकर, प्रियंका मेस्त्री, क्रांती धुरी, स्नेहा घाडीगावकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा