महामानव भागोजी शेठ कीर यांचा 156 वा जयंती सोहळा भव्य दिव्य स्वरूपात संपन्न
मुंबई :
भागोजी शेठ कीर स्मृती समितीच्या वतीने हिंदू धर्म रक्षक दानशूर महामानव भागोजी शेठ कीर यांच्या 156 वा जयंती सोहळा, शोभायात्रा मिरवणूक व अभिवादन सभा मुंबई शिवाजी पार्क येथे राष्ट्रीय अध्यक्ष नवीन चंद्र बांदिवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी या समितीचे अध्यक्ष किशोर केळसकर, समिती सचिव विलास कीर,समिती समन्वयक जगदीश आडवीरकर, वरिष्ठ उपाध्यक्ष श्रीकांत सावंत, निमंत्रक डॉक्टर जयप्रकाश पेडणेकर कार्याध्यक्ष विनोद चव्हाण, भागोजी किरांचे वंशज धनंजय कीर, दशरथ कीर, राकेश फोंडकर,जगदीश आडवीरकर आणि समितीचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना नवीनचंद्र बांदिवडेकर म्हणालेत भागोजी कीर यांनी आपले संपूर्ण जीवन हे हिंदू धर्म रक्षणासाठी समर्पित केलेले होते.भागोजी कीर यांचे कार्य आणि कर्तुत्व सर्वांसाठी अभिमानाचे असे आहे. भागोजी कीर यांची जयंती यावर्षी प्रतिवर्षापेक्षाही अतिशय भव्य दिव्य स्वरूपात आपल्या सर्वांच्या सहकार्याने पार पडत आहे. त्यांनी केलेले समाजासाठीकार्य, संदेश आणि त्यांचे विचार, त्यांचा दानशूर पणा आपण सर्वांनी आत्मसात करूया हेच आजच्या दिनी त्यांना खऱ्या अर्थाने अभिवादन असेल.
यावेळी बोलताना या समितीचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज सेवा समिती कार्यवाह श्रीकांत सावंत म्हणालेत भागोजी कीर आणि पाचलेगावकर महाराज यांचे अगदी घनिष्ठ संबंध होते. थोर संत पाचलेगावकर महाराज यांनी भागोजी कीर यांना हिंदू धर्म रक्षक अशी पदवी बहाल केली होती. यातूनच त्यांच्या कार्याची आपल्या सर्वांना महती येते. मुंबईसारख्या ठिकाणी आपल्या दानशूर वृत्तीमुळे भागोजी शेठ कीर हे अजरामर दानशूर व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांचे कार्य कर्तुत्व विचार आपण सर्वांनी जोपासून यापुढेही काम करणे गरजेचे आहे. भागोजी शेठ कीर स्मृती समिती ने अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करून आजचा हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी बोलताना भांडुप भंडारी मंडळाचे अध्यक्ष श्री विनोद चव्हाण म्हणालेत भागोजी कीर यांनी आपले जीवन हे स्वातंत्र्यासाठी आणि हिंदू धर्म रक्षणासाठी पणाला लावले होते. म्हणूनच ते खऱ्या अर्थाने हिंदू धर्म रक्षक बनले.यावेळी विविध मान्यवरांनी भागोजी शेठ कीर यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले. बेंगॉल केमिकल नाका सेंचुरी बाजार वरळी ते भागोजीगीर स्मृतिस्थळ दादर चौपाटी या मार्गावरती भव्य दिव्य अशी शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी विविध भंडारी समाजाचे पदाधिकारी, विविध समाजातील प्रतिनिधी, समिती सदस्य, महिला सदस्य उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा समितीच्या वतीने गौरव करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भागोजी शेठ कीर स्मृती समितीच्या सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.