घरकूलच्या भूमिहीन लाभार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे सरपंच संदिप मेस्त्री यांचे आवाहन
कणकवली :
तहसील कार्यालय व ग्रामपंचायत कलमठ यांच्या संयुक्त विद्यमाने कलमठ ग्रामपंचायत सभागृहात भूमिहीन दाखल्यांसाठी खास शिबिराचे आयोजन केले आहे. कलमठ गावात ४५ घरकुल लाभार्थींना घरे मंजूर झाले असून भूमिहीन असलेल्या लाभार्थ्यांना भूमिहीन दाखला सुलभतेने मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत कलमठ येथे भूमिहीन दाखल्यांचे शिबिर आयोजित केले आहे.
कलमठ ग्रामपंचायत सभागृहात एकाच ठिकाणी तहसील सेतू कार्यालय प्रतिनिधी, पोलिस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित राहून सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात येणार आहे. त्यामुळे दाखला मिळणे सुलभ होणार असल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तरी सर्व लाभार्थींनी गुरुवारी सकाळी १० वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामपंचायत कलमठच्या वतीने करण्यात आले आहे.