You are currently viewing कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांचे कडुन वेताळ प्रतिष्ठान , तुळस यांच्या रुग्ण सेवा केंद्रास जंबो ऑक्सिजन सिलेंडर प्रदान

कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांचे कडुन वेताळ प्रतिष्ठान , तुळस यांच्या रुग्ण सेवा केंद्रास जंबो ऑक्सिजन सिलेंडर प्रदान

*कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांचे कडुन वेताळ प्रतिष्ठान , तुळस यांच्या रुग्ण सेवा केंद्रास जंबो ऑक्सिजन सिलेंडर प्रदान*

*भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांच्या शुभहस्ते वेताळ प्रतिष्ठानला सुपूर्द*

*सेवा आणि समर्पणाचा अनमोल दान – वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस च्या कै. आशा पुरुषोत्तम पाटणकर रुग्ण साहित्य सेवा केंद्राला जंबो ऑक्सिजन सिलेंडर किट प्रदान*

जीवन हे अनमोल आहे, आणि संकटाच्या काळात मदतीचा हात मिळणे हीच खरी माणुसकीची ओळख. अशाच माणुसकीचा आदर्श घालून देत, *कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते दयानंद कुबल* यांच्या कडून ३०,९७५ रुपये किमतीचा जंबो ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन फ्लो मिटर, स्पॅनर, ट्रॉली इ. वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग,तुळस अंतर्गत कार्यरत असलेल्या कै. आशा पुरुषोत्तम पाटणकर रुग्ण साहित्य सेवा केंद्र यांना प्रदान करण्यात आला.
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाई यांच्या हस्ते ऑक्सिजन सिलेंडर किट मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी दयानंद कुबल, अध्यक्ष (कोकण कला व शिक्षण विकास संस्था), वेताळ विद्या मंदिर तुळस चे मुखाध्यापक हरमलकर सर, प्रथमेश सावंत, प्रीति पांगे, साक्षी पोटे (मुंबई हेड ऑफिस कोकण कला व शिक्षण विकास संस्था) आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी दयांदय कुबल यांचा वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस कडून शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
जेव्हा एखाद्या रुग्णाला प्राणवायूची गरज असते, तेव्हा मिळणारा प्रत्येक श्वास हा अनमोल असतो. कै. आशा पुरुषोत्तम पाटणकर रुग्ण साहित्य सेवा केंद्र गेली अनेक वर्षे गरजूंना मोफत साहित्यसेवा देत आहे. या सेवाभावी कार्याला साथ देत, कोकण कला आणि विकास संस्थेने केलेले हे योगदान म्हणजे माणुसकीच्या प्रकाशाचा आणखी एक तेजस्वी किरण आहे असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे प्रसन्ना देसाई यांनी केले.
“रुग्णांसाठी केलेली सेवा हीच खरी ईश्वरसेवा” या विचाराने प्रेरित होत, सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी अशाच प्रकारे मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन दयानंद कुबल यांनी केले. यावेळी प्रतिष्ठान चे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक तिरोडकर यांनी तर आभार महेश राऊळ यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा