You are currently viewing सुख अलौकिक

सुख अलौकिक

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*सुख अलौकिक*

***************

बकुळ फुलांच्या पारावरती

मत्तधुंद गंध तुझा दरवळतो

मी मज झणी भुलूनी जाता

शब्दांना बहर प्रीतीचा येतो…..

 

सभोवारी तर तुझी नजाकत

माहोल सुंदर निरागसी होतो

गीतात गुंफण शब्दांची न्यारी

अव्यक्ता , त्या मीच बिलगतो….

 

बंद पापण्या मिटता , मीटता

मी तुझ्या रुपात स्वर्ग पाहतो

सुख हेच अतर्क्य अलौकिक

आज पारावरी झेलीत रहातो….

***********************

*( 19 )*

*©️विगसातपुते. ( भावकवी )*

प्रतिक्रिया व्यक्त करा