राज्यस्तरीय हीरक पंख/ चतुर्थ चरण चाचणी शिबिरात स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांना स्पृहणीय यश
सावंतवाडी
दिनांक २७/२/२०२५ ते १/३/२०२५ या कालावधीत सिंधुदुर्ग भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालयात राज्यस्तरीय हीरक पंख/ चतुर्थ चरण चाचणी शिबिर संपन्न झाले. या चाचणी शिबिराचे प्रमुख म्हणून श्रीम. अंजली माहुरे व श्री. सोमनाथ गायकवाड यांनी कार्य केले. सदरील आयोजित शिबिरात कब- बुलबुल अभ्यासक्रमावर आधारित लेखी, तोंडी प्रत्यक्षिक परीक्षा घेण्यात आल्या. या शिबिरासाठी श्रीम. रेखा वंटे, श्री. जे. डी. पाटील, श्री. अनंत बांदेकर यांनी परीक्षक म्हणून कार्य केले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सदरील शिबिर पार पडले. स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या ११ कब आणि १ बुलबुल यांनी या परीक्षेसाठी सहभाग दर्शवला. या परीक्षेत विद्यार्थ्यांची ५० गुणांची लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक व २५० गुणांची तोंडी परीक्षा होती. तसेच विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त व स्वयंसेवा यांचे अमूल्य असे ज्ञान प्राप्त झाले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांनी अतिशय हिरिरीने हस्तकला, चित्रकला, कागदकाम, प्रथमोपचार, शारीरिक कसरती, सत्कृत्य, दिशाज्ञान, रजत पंख व कोमल पंख या कब – बुलबुलच्या अभ्यासक्रमावर आधारित सर्व परीक्षा विद्यार्थ्यांनी अतिशय कलात्मकरित्या पार पडल्या. निरीक्षक व सायकलिस्ट या दोन प्राविण्य पदकांवर आपले नाव कोरले. रात्री विद्यार्थ्यांना शेकोटी कार्यक्रमात गाणी, गोष्टी, मुलाखती यांची उत्कृष्ट सादरीकरण केले. तसेच विद्यार्थ्यांना निवासी शिबिर असल्याने विद्यार्थ्यांनी सहभोजन घेतले व रात्रीच्या वेळेस गायकवाड सर यांनी ॲमेझॉनच्या खोऱ्यात घडलेली व मुलांचे आयुष्य अमुलाग्र बदलवणारी स्काऊट गाईडच्या मुलांची कथा ऐकवून विद्यार्थ्यांच्या मनोरंजनाबरोबरच समाजभानाचे महत्त्व पटवून दिले. तर, जिल्हा बुलबुलप्रमुख श्रीम. अंजली माहुरे यांनी जगण्याचे कौशल्य शिकविले. निरीक्षक व सायकलिस्ट या दोन विषयांसाठी प्राविण्य पदके अर्जित केली. त्या पदकांचे वितरण प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांच्या हस्ते प्रशालेत करण्यात आले. या परीक्षार्थींना कब – बुलबुल फ्लॉक लिडर व कब पॅक मास्टर सौ. सुषमा पालव व कु. विनायकी जबडे यांचे मार्गदर्शन लाभले. अशाप्रकारे, सदरील शिबिर अतिशय हसतखेळत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. प्रशालेच्या संस्थापक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन व शुभेच्छा दिल्या.