मंत्री नितेश राणे यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचा घेतला समाचार
मुंबई :
औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्याच्या राजवटीत भारताची सीमा ही अफगाणिस्तान आणि बर्मा देशापर्यंत होती, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. अबू आझमींच्या वक्तव्याचे विधानसभेत देखील पडसाद उमटले. अबू आझमी यांच्या या वक्तव्यावर मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी जोरदार हल्लाबोल केला.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू स्वराज्य स्थापन केले. मुघलांनी आपली हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली, लोकांचे धर्मांतर केले, शिवाजी महाराजांनी याविरुद्ध आवाज उठवला आणि जर अबू आझमी हे समजू शकले नाहीत तर त्यांनाही औरंगजेबाकडे पाठवावे लागेल. निलंबनाने काहीही होणार नाही, त्यांना औरंगजेबाच्या शेजारीच कबरीत पुरले पाहिजे,” असे मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे. जर अबू आझमीला औरंग्याची जास्तच आठवण येत असेल तर त्यांच्या कबरीसाठी औरंग्याच्या कबरीच्या बाजूला अबू आझमीची कबर खोदून ठेवू असा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला.
औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांचे ज्या पद्धतीने हाल केले ते आज जगभर पाहिले जात आहेत. हिंदवी स्वराज्याची लढाई इस्लाम विरोधात होती आणि त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून औरंग्या विरुद्ध लढा दिला. ही लढाई इस्लामच्या विरोधात होती. त्यावेळी कोणताही सेक्युलर शब्द सुद्धा अस्तित्वात नव्हता. सेक्युलर हा काँग्रेसने आणलेला शब्द आहे. हे या जिहादी विचारांच्या आणि मानसिकतेच्या कारट्यांना कळेल तेव्हा ते औरंग्याला स्वप्नात पाहायचे बंद होतील. असे मंत्री नितेश राणे यांनी सुनावले.

