You are currently viewing ८ मार्च रोजी मसुरे डांगमोडे येथे महिला आणि पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धा

८ मार्च रोजी मसुरे डांगमोडे येथे महिला आणि पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धा

मालवण / मसुरे

नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे यांच्या वतीने आयोजित आणि सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा दि.८ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता मसुरे डांगमोडे रवळनाथ मंदिर येथे श्री भवानी मातेच्या वार्षिक गोंधळ उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आली आहे. या वेळी विजेत्या पुरुष गटासाठी प्रथम क्रमांक ७००० व चषक, द्वितीय क्रमांक ५००० व चषक, उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड व अष्टपैलू खेळाडूंना प्रत्येकी ५०० रुपये व चषक देण्यात येणार आहे. तर महिला गटासाठी प्रथम क्रमांक ७००० व चषक, द्वितीय क्रमांक ५००० व चषक तसेच उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ठ पकड व अष्टपैलू खेळाडू यांना प्रत्येकी ५०० व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेतील सर्व चषक कै. शिवाजी गंगाराम ठाकूर यांच्या स्मरणार्थ पुरस्कृत करण्यात आले आहेत. स्पर्धेदरम्यान सर्व खेळाडू आणि सहभागी कबड्डी हितचिंतक यांची मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्पर्धा सायंकाळी सहा वाजता सुरू होईल. या स्पर्धेचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या शुभहस्ते होणार असून यावेळी मालवण कुडाळ मतदार संघाचे आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना नेते संजय आंग्रे, नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे चे सर्व पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महिला आणि पुरुष कबड्डी स्पर्धेसाठी संपर्क नितीन हडकर मो.७२४९३५७२३९, दत्तप्रसाद पेडणेकर मो. ९४२११४५८२७ यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा