You are currently viewing होळी उत्सवासाठी साप्ताहिक विशेष रेल्वे चालविण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय

होळी उत्सवासाठी साप्ताहिक विशेष रेल्वे चालविण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय

होळी उत्सवासाठी साप्ताहिक विशेष रेल्वे चालविण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय

कणकवली,

होळी उत्सवादरम्यान कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपूरम उत्तर – लोकमान्य टिळक (टी) ही साप्ताहिक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. लोकमान्य टिळक (टी) तिरुवनंतपुरम उत्तर ०१०६३ साप्ताहिक विशेष गाडी गुरुवार, ६ आणि १३ मार्च रोजी लोकमान्य टिळक (टी) येथून दुपारी ४ वाजता सुटणार आहे. दुसऱ्या दिवशी रात्री १०.४५ वाजता तिरुवनंतपूरम उत्तर येथे पोहोचेल. तिरुवनंतपूरम उत्तर-लोकमान्य टिळक (टी) ०१०६४ साप्ताहिक विशेष तिरुवनंतपुरम उत्तर येथून शनिवार, ८ आणि १५ मार्च रोजी दुपारी ४.२० वाजता सुटुन तिसऱ्या दिवशी मध्यरात्री १२.४५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा,खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका, सुरेंद्र रोड, अंबरनाथ रोड येथे थांबेल. मंगळूरू जंक्शन, कासरगोड, कन्नूर, कालिकत, तिरुर, शोरानूर जंक्शन, त्रिसूर, एर्नाकुलम टाऊन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलीकारा, कायनकुलम आणि कोल्लम जंक्शनवर थांबणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा