You are currently viewing नागपूर येथे नुकतेच अकरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अतिशय थाटात संपन्न

नागपूर येथे नुकतेच अकरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अतिशय थाटात संपन्न

नागपूर :

नुकतेच, नागपूरच्या जवाहर विद्यार्थी गृह सभागृहात, मराठी साहित्य मंडळ नागपूर विभागातर्फे, आयोजित ११ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अतिशय थाटामाटात संपन्न झाले. कविवर्य सुरेश भटांचे नाव, या साहित्य संमेलनाच्या परिसराला देण्यात आले होते. मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोल घुमट यांच्या आशीर्वादाने व प्रेरणेने, ज्येष्ठ कवी, लेखक सिद्धार्थ कुलकर्णी (मुंबई महानगर प्रदेश अध्यक्ष) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे वैशिष्ट्यपूर्ण अकरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, साजरे झाले. संमेलनाची सुरुवात, सकाळी आठ वाजता, खाटूश्याम मंदिर न्यू नंदनवन येथून थाटामाटात ग्रंथ दिंडी निघून, वाजत गाजत, भजन गात व वाचन संस्कृती पुरस्कृत नारे देत, मराठी भाषेचे कौतुक करीत, घोषणा देत संपूर्ण आजूबाजूचा परिसर गाजवीत, कार्यक्रम स्थळी पोहोचली, यात अनेक शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, भजन मंडळ व अनेक दुर दुर ठिकाणावरून आलेले सर्व नामवंत कवी, साहित्यिक, सहभागी झाले होते. नंतर थोड्यावेळाने कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा सुरू झाला. रत्नाकर मुळीक (जिल्हा उपाध्यक्ष) यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या गोड व अमृतवाणीने सुरू केले. पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर, उपस्थित सर्व पुरुष सन्माननीय पाहुणे यांचे मंचावर स्वागत, ग्रंथभेट, तुळशीचे रोपटे व सन्मानचिन्ह देऊन डॉ इंजी प्रवीण उपलेंचवार (विदर्भ प्रांतपाल) यांनी केले व तशाच रीतीने मंचावरील सर्व स्त्री सन्माननीय पाहुण्यांचे स्वागत सौ. नीता चीकारे (नागपूर जिल्हाध्यक्ष) यांनी केले . उद्घाटन सोहळ्याची सुरुवात , डॉ मनीष उपाध्ये यांनी संगीत दिग्दर्शित केलेले आणि सौ. सुषमा मुलमुले यांनी शब्दबद्ध केलेले, सुंदर संमेलन गीत रसिका बावडेकर यांनी गोड आवाजात सादर करून , श्रोत्यांचे मन जिंकले . .त्यानंतर संमेलनाचे प्रास्ताविक सादर करताना डॉ इंजि प्रवीण उपलेंचवार (विदर्भ प्रांतपाल) यांनी अतिशय प्रभावीपणे सुंदर रित्या सादर केलेल्या आपल्या संवादामध्ये ,मागील दीड दोन महिन्यापासून या संमेलनाच्या तयारीसाठी कसे अथक परिश्रम घ्यावे लागले व अशा साहित्य संमेलनाची आवश्यकता व त्यातून समाजाला निष्पन्न होणारे अनेक फायदे यावर, आपल्या अमोघ वाणीने प्रकाश झोत टाकला. त्यानंतर, मावळत्या संमेलनाध्यक्षा डॉ रेखा जगनाळे मोतेवार यांनी सुंदर रित्या बोलतना, मराठी भाषेच्या वापराकडे आपण कसे दुर्लक्ष करतो व हवा तसा त्याचा अभिमान बाळगत नाही, हे दुःख व्यक्त करून, तामिळनाडू राज्यासारखा, आपण पण आपल्या स्थानिक भाषेचाच म्हणजेच मराठीचा फक्त वापर व अभिमान का बाळगू नये ? असे प्रश्नचिन्ह उभे केले. त्यानंतर मावळत्या संमेलनाध्यक्षा डॉ सौ रेखा जगनाळे मोतेवार यांनी नवीन संमेलनाध्यक्षा सौ पुष्पा तायडे यांच्याकडे आपला कार्यभार सुपूर्द केला. अशा प्रकारे अकराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे रीतसर उद्घाटन झाले असे विशेष अतिथी मा.मंगेश घवघवे (प्राचार्य नंदनवन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय) यांनी घोषित केले. यावेळी मंचावर त्यांच्या सुविद्य पत्नी आर्किटेक्ट पुनम घवघवे पण उपस्थित होत्या. त्यानंतर पुणे वरून आलेले, माजी संमेलनाध्यक्ष डॉ विनायकराव जाधव (महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष) यांनी आपल्या संभाषणात, मराठी साहित्य मंडळाची अनेक प्रकारची संपूर्ण भारतभरात व विदेशातही कशी अल्पावधीतच प्रदीर्घ वाटचाल झाली ही खूप कौतुकाची गोष्ट असल्याचे प्रकट केले. तसेच श्री सिद्धार्थ कुलकर्णी (मुंबई महानगर प्रदेश अध्यक्ष) यांचा वाढदिवस, केक कापून साजरा करताना श्री राजू वाघ यांनी त्यांना केक भरवून त्यांचे तोंड गोड केले व सर्वांनी शुभेच्छा देऊन, सर्व प्रमुख पाहुण्यांनी व मराठी साहित्य मंडळ नागपूर विभागाच्या सर्व सदस्यांनी, मिळून साजरा केला. यापुढे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री कुमार श्रेयस जे चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आहेत. त्यांनी आपल्या छोट्याशा भाषणात आपले चित्रपट निर्मितीचे अनुभव सांगताना, मराठी चित्रपटांना कशी दुय्यम भावनेने वागणूक दिली जाते व यावर आपण निश्चित उपाय काढले पाहिजे, असे वक्तव्य जाहीर केले. पुढे कार्यक्रमात माननीय रितू चव्हाण, ज्या अभिनेत्री व आध्यात्मिक वक्त्या म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या आपल्या हिंदी मराठी संयुक्त संभाषणात म्हणाल्या की, मराठी भाषा अतिशय गोड असून त्यातील साहित्य अतिशय दमदार आहे , यामुळेच या साहित्याशी जुळताना मला अतिशय आनंद होतो. पुढे रोडमार्क फाउंडेशनचे संचालक राजेश वाघ यांनी अपघातग्रस्तांना मदत करावी अशी शपथ सर्व उपस्थित प्रेक्षकांकडून, वदवून घेतली. त्यानंतर कार्यक्रमांमध्ये, संमेलन यशस्वी करण्यासाठी ,दिलेल्या अनेक लोकांचा व काही शाळांनी व संस्थांनी दिलेल्या सहकार्यासाठी, त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन मंचावर कौतुक करण्यात आले. त्यानंतर पुण्याचे सुप्रसिद्ध निस्पृह पत्रकार, सुनील भोसले यांचा त्यांच्या निर्भिड, प्रामाणिक व कौतुकास्पद सेवेसाठी सत्कार व सन्मान करण्यात आला. पुढे श्री सिद्धार्थ कुलकर्णी (मुंबई महानगर प्रदेश अध्यक्ष) हे आपल्या भाषणात आनंदाने सांगत होते, की कशा प्रकारे डॉ जयप्रकाश घुमटकर सरांनी मुद्दाम त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी या भव्य कार्यक्रमाच्या आयोजनाच्या नागपूर विभागाला सूचना दिल्या, आणि त्यांनी आपल्या बॉलीवुड मधील ३५ वर्षांच्या अनुभवाचा सारांश सांगताना बॉलिवूड मधे काम करत असताना त्यातूनच ते लेखन आणि साहित्या कडे कसे वळले याचे, काही रंजक किस्से सांगून, कथन केले. उद्घाटन सोहळ्याच्या सरते शेवटी, संमेलनाध्यक्षा डॉ श्री पुष्पा तायडे यांनी, आपल्या मधुर वक्तव्यात, मराठी अजून आपल्या आचरणात, विचारात व वापरातही घट्ट रीतीने रुजवली पाहिजे, ही अतिशय मार्मिक समस्या व तळमळ व्यक्त केली. मराठीच्या जास्तीत जास्त वापरानेच मराठी भाषेचा आणि साहित्याचा कसा प्रचार व प्रसार अजून जास्त होत जाईल हा उपाय पण सांगितला.

या उत्तरोत्तर रंगत जाणाऱ्या कार्यक्रमाच्या पुढच्या सत्राचे सूत्रसंचालन, डॉ प्रवीण उपलेंचवार (विदर्भ प्रांतपाल) यांनी हाती घेऊन, प्रथम त्या सत्राच्या पाहुण्यांचे स्वागत , रत्नाकर मुळीक (जिल्हा उपाध्यक्ष) यांचे हस्ते केले.परिसंवाद विषय ‘वाचन संस्कृती वास्तव व अपेक्षा’ यावर प्रकाश झोत टाकण्यासाठी जळगाव वरून पाचारण केलेले, या सत्राचे प्रमुख पाहुणे श्री.बापूराव पाटील ठाकरे (जळगाव जिल्हाध्यक्ष) यांनी थोडक्यात , वाचन संस्कृतीचा कसा ऱ्हास होत आहे. त्यामुळे आपण आपले किती नुकसान करतो आहे. हे थोडक्यात आपल्या सुंदर शब्दात सादर करून व कविता पण सादर करून, यावर आपण उपाय शोधलेच पाहिजे हे पण शल्य व्यक्त केले. परिसंवाद सत्राच्या अध्यक्षा , ॲड . सौ निता कचवे (अमरावती जिल्हाध्यक्ष) या आपल्या सुंदर व प्रभावी वाणीमध्ये , वाचन संस्कृतीचा दिवसेंदिवस ऱ्हास होत असल्यामुळे , आपण आपली संस्कार मूल्य सुद्धा दिवसे दिवस कमी करतो आहे व वाचाल तर वाचाल हे प्रत्यक्षात कशा रीतीने सार्थ होते हे अनेक उदाहरणाद्वारे पटवून दिले . या सत्राचे आभार प्रदर्शन डॉक्टर रमणिक लेंगुरे (जिल्हा उपाध्यक्ष) जे वाचन संस्कृती टिकवण्यासाठी मागील अनेक वर्षापासून अथक परिश्रम करत आहेत, त्यांनी सर्वांचे आभार मानून वाचन संस्कृतीवर एक छोटीशी कविता सादर करून, त्यांची त्या प्रती असलेली तळमळ व्यक्त केली. पुढच्या कवी संमेलनाच्या सत्रात, भारताच्या विविध भागातून आलेल्या सुमारे ४५ कवींनी आपल्या कविता सादर केल्या. या सत्राचे सूत्रसंचालक डॉ. इंजी प्रवीण उपलेंचवार (विदर्भ प्रांतपाल) यांनी ही काव्य स्पर्धा असल्याचे आधीच घोषित केल्याने, सारे कवी, आपल्या एकाहून एक सरस कविता सादर करून, प्रेक्षकांची मने जिंकत होते. या सत्राच्या प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ कवियत्री, डॉ छाया पाथरे अमरावती यांनी, आपल्या भाषणात कवितेच्या गोडीची महती व्यक्त केली. नंतर या सत्राच्या अध्यक्षा ज्येष्ठ कवियत्री संगीता रामटेके (अध्यक्ष गडचिरोली) या आपल्या संभाषणात म्हणाल्या की, कवितांची गोडी अतिशय अविट असते व कविता कुणाला मार्गदर्शन पण करू शकते. सरते शेवटी काव्य स्पर्धेच्या परीक्षक, डॉ ज्योती नागपूरकर (तालुकाध्यक्ष नागपूर) व संजीवनी काळे (अमरावती) दोघींनी स्पर्धेचा निकाल जाहीर करून, प्रेक्षकांना खुश करून टाकले व विजेत्यांना यांच्या हस्ते व या सत्राच्या पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. शेवटी सर्वांचे आभार मानून ,या एकदिवसीय अकराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सांगता झाली. हे संमेलन यशस्वी होण्यासाठी मुख्य आयोजक डॉ इंजि प्रवीण उपलेंचवार (विदर्भ प्रांतपाल) व रत्नाकर मुळीक (जिल्हा उपाध्यक्ष) यांच्या सह, आयोजन समिती सदस्य, सौ नीता चीकारे (नागपूर जिल्हाध्यक्ष) डॉ रेखा जगनाळे मोतेवार (मावळत्या संमेलन अध्यक्ष) डॉ मनीष उपाध्ये (जिल्हा सचिव), डॉ ज्योती नागपूरकर (तालुका अध्यक्ष) ,डॉ रमणिक लेंगुरे (जिल्हा उपाध्यक्ष) समाज सेवक श्री.राजेश वाघ (विदर्भ संघटक) व लैलेशा भूरे (तालुका सचिव) या पदाधिकाऱ्यांनी व इतर काही सदस्यांनी अथक व मोलाचे परिश्रम घेतले. यात मुख्य समन्वयक म्हणून सौ. पूनम घवघवे आणि श्री. निलेश घवघवे यांनी मोलाची भूमिका बजावली. तसेच या सोहळ्यास ग्रंथ दिंडीतील विद्यार्थी, कवी, साहित्यिक, अनेक मान्यवर, पत्रकार, टीव्ही चॅनल असे सर्वच स्तरातील जवळपास ३५० ते ४०० लोकांनी उपस्थिती लावली. एकंदरीत हे अकरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे अभूतपूर्व असे यशस्वी झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा