*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
...आलं थैमान पुराचं बाई…
आलं थैमान पुराचं बाई, त्यात सारंच वाहून जाई…
घरदारही वाहून जातं, खाली फक्तहो गाळ राहतो,चिखल मातीचा किती तो राडा,
त्यात फसतो संसार गाडा, नियती पुढे हो
चालत नाही… आलं थैमान पुराचं बाई…
एक थैमान असं मनात, नाही दिसत उघड जनात,
मनं पोखरतं रोज रोज, नको इर्ष्या नि स्पर्धा
कुणाशी, काहो खेळावे उगा जीवाशी,
सुख कुठेच सापडत नाही… आलं थैमान पुराचं….
नाव बुडते मग खोल खोलं, ढासळतो हो जीवाचा
तोल, आपले आयुष्य हो अनमोल,हवी कश्शाला
ती घालमेल,आपल्या पंखात जितके बळ,
फक्त खेळावा तितका खेळ, जना,कळते
वळत नाही.. आलं थैमान पुराचं बाई…
जन, सावरावे हो वेळीचं, नको वागणे पहा कलीचं, काही फायदा नसतो जळून, जाता
येतही नाही पळून, प्रश्न खराच विचारा मना,
त्याचे उत्तर खरेच द्याना,शहाणपणाचं उत्तर
बाई…आलं थैमान पुराचं बाई….
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)