You are currently viewing दांडी येथून किल्ला प्रवासी होडीसेवा पुन्हा सुरु होणार!

दांडी येथून किल्ला प्रवासी होडीसेवा पुन्हा सुरु होणार!

दांडी येथून किल्ला प्रवासी होडीसेवा पुन्हा सुरु होणार!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यतत्परतेमुळे परवानगी : उर्वरित व्यवसायिकांनाही लवकरच परवानगी मिळणार

मालवण

मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यतत्परतेमुळे दांडी येथून किल्ला होडीसेवा सुरु करण्यास व्यवसायिकांना परवानगी प्राप्त झाली आहे. उर्वरित मागणीप्राप्त व्यवसायिकांना पुढील काही दिवसात परवानगी प्राप्त होणार आहे. मंत्री नितेश राणे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर प्रवासी होडी व्यवसायिकांच्या वतीने करण्यात येणारे उपोषण न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, रखडलेल्या सहा जणांच्या किल्ला होडीसेवा वाहतूक परवानगीपैकी एकाची परवानगी तात्काळ देण्यात आलेली असून उर्वरीत पाच जणांचीही परवानगीही मिळण्याबाबत कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

यासंदर्भात पर्यटन व्यावसायिकांनी दिलेल्या पत्रात असे महटले आहे की, महाराष्ट्र सागरी महामंडाकडून दांडी येथे प्लोट जेट्टी बसवून देण्यात आली. त्याचे उद्‌घाटन ७ जानेवारी रोजी मालवण-कुडाळचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाले. दांडी येवून किल्ला होडीसेवा सुरु करण्यास परवानगी मागणी करणाऱ्या सहा जणांपैकी सौ. सुमेधा मेघनाद पुरी यांना परवानगी दिलेली आहे. विठ्ठल रामदास केळुसकर, संतोष प्रकाश केळुसकर, महादेव बाळा कोयंडे, सौ मिनल संतोष परब, रुपेश मोरेश्वर प्रभू यांच्या मागणी बाबत मंत्री नितेश राणे यांच्याशी संपर्क झाल्याप्रमाणे सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आम्ही सोमवार १० मार्च २०२५ पर्यंत उपोषण करणार नाही. तोपर्यंत परवानगी प्राप्त होईल. अशी अपेक्षा आहे. असे व्यवसायिकानी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा