You are currently viewing यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कुल आणि नाद संगीत अकॅडेमी यांच्या माध्यमातून ”गुण गुण गाणी” आजोबा आणि नातवंडांच्या आठवणींची अनोखी कहाणी कार्यक्रम संपन्न

यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कुल आणि नाद संगीत अकॅडेमी यांच्या माध्यमातून ”गुण गुण गाणी” आजोबा आणि नातवंडांच्या आठवणींची अनोखी कहाणी कार्यक्रम संपन्न

यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कुल आणि नाद संगीत अकॅडेमी यांच्या माध्यमातून ”गुण गुण गाणी” आजोबा आणि नातवंडांच्या आठवणींची अनोखी कहाणी कार्यक्रम संपन्न

सावंतवाडी

यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कुल आणि नाद संगीत अकॅडेमी यांच्या माध्यमातून बालपणीच्या आठवणी ”गुण गुण गाणी” आजोबा आणि नातवंडांच्या आठवणींची अनोखी कहाणी कार्यक्रम सावंतवाडी येथे संपन्न झाला. लेखक, दिग्दर्शक डॉ. राजेंद्र चव्हाण, नृत्य दिग्दर्शक भूषण बाक्रे, सौ. अदिती दळवी, सौ. सानिका कुडतरकर तसेच अभिषेक गवंडे यांचे विशेष सहाय्य या कार्यक्रमास लाभले. आदित्य आचरेकर, गोपाळ पवार यांची संकल्पना असलेल्या या नाटक, गाणी आणि नृत्य आविष्कारास अबालवृद्धांचा उदंड प्रतिसाद लाभला.

प्रारंभी चंद्रशेखर आचरेकर, यशवंत पवार, संजीव गवंडे, आदित्य आचरेकर, गोपाळ पवार आदींच्या हस्ते श्रीफळ फोडून कार्यक्रमास शुभारंभ करण्याय आला. यावेळी भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, अध्यक्षा अस्मिता सावंत भोसले, जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्सचे शाखा व्यवस्थापक अजित खैरे, गुरूनाथ पोकळे, आदिवा क्रीएशनचे आदिती पोकळे, वर्धन पोकळे, सचिन देसाई आदींचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा हा कार्यक्रम बॅरिस्टर नाथ पै सभागृह, सावंतवाडी येथे पार पडला. सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर, सांग सांग भोलानाथ, चांदोबा चांदोबा भागलास का, शेपटी वाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा, नाकारवरचा रागाला औषध काय ?, छान छान छान मनिमाऊच बाळ, ससा तो ससा, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, एका माकडानं काढलं दुकान आदी गीतांच सादरीकरण करण्यात आले. सर्वांना त्यांच्या लहानपणीच्या आठवणी या निमित्ताने नाट्य, नृत्य आणि गायनाच्या माध्यमातून अनुभवता आल्या. नाद अकॅडमीचे आदित्य आचरेकर आणि गोपाळ पवार यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या कलाकृतीमध्ये नाद संगीत अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी गायन माहिन घाटकर, स्वरांगी गोठोस्कर, विधी ठाकूर, वेदांत सामंत, वरदा वारंग, शौर्या वारंग, धनश्री साटम, सौम्या नाईक, मैथिली सावंत, निधी धुरी, स्वरांजली पाटील, खुशी खरात आणि सान्वी गावडे तर संकल्प क्रिएशन डान्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी रुद्रा नेवाळकर, प्रांजल पुराणिक, पूर्वा तेंडोलकर, सरिषा जाधव, दुर्वा बिडये, चैताली राणे, मनस्वी परब, सावी जाधव, वैष्णवी पाटील आणि अनन्या यांनी नृत्य सादरीकरण केले. डॉक्टर राजेंद्र चव्हाण यांचे उत्कृष्ट लेखन आणि दिग्दर्शन यांने कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाचे संगीत संयोजन आदित्य आचरेकर यांनी तर नृत्य संकल्प क्रिएशनच्या अदिती दळवी, सानिका कुरतडकर आणि भूषण बाक्रे यांनी पाहिले. कार्यक्रमाचा सूत्रधार आणि नट सचिन देसाई व सुप्रसिद्ध सूत्रसंचालक अक्षय सातार्डेकर यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. यावेळी सर्वेश पिंगूळकर, राहूल शिरोडकर, अतुल उमळकर, शाम तेंडोलकर, शेखर सातोसकर, नागेश नेमळेकर, गौरव दळवी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा