कांदळगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून शवपेटीचे लोकार्पण…
मालवण
कांदळगाव ग्रामपंचायत येथे सरपंच रणजीत परब यांनी १५ व्या वित्त आयोगातून उपलब्ध करून दिलेल्या शवपेटीचे लोकार्पण करण्यात आले.
गावात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास तालुक्याच्या ठिकाणाहून शेवपेटी आणावी लागत होती. यात जास्त खर्च होत असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत होती. त्यामुळे सरपंच रणजीत परब यांनी पंधराव्या वित्त आयोगातून गावासाठी शेवपेटी उपलब्ध करून घेतली. याचे लोकार्पण आज करण्यात आले. गतवर्षी स्मशानभूमी मध्ये स्ट्रेचरची आवश्यकता भासत होती. तीही ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी उपसरपंच राजेंद्र कदम, ग्रामपंचायत सदस्य दत्तविहार कोदे, संतोष पारकर, मधुरा परब, अनघा कदम, शारदा मुळये, ग्रामविकास अधिकारी सागर देसाई, सोसायटीचे चेअरमन प्रसाद भोगले, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस पाटील, आरोग्य कर्मचारी, कृषी सहाय्यक व ग्रामस्थ उपस्थित होते.
